---Advertisement---

धोनीच्या टिकाकारांना ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल

On: मंगळवार, मे 28, 2019 5:22 PM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी ३० मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे त्याची या विश्वचषकातील कामगिरीही भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पण मागील काही काळापासून त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. तसेच त्याने निवृत्ती घेण्याबद्दलही चर्चा होत आहेत.

पण ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने धोनीला पाठिंबा देत टिकाकारांना खडेबोल सुनावले आहेत.

वॉर्न आयएएनएसशी बोलताना म्हणाला, ‘धोनी भारतीय क्रिकेटचा शानदार सेवक आहे. त्याने भारतीय क्रिकेटला सर्वकाही दिले आहे. मला विश्वास बसत नाही काही लोक धोनीच्या विश्वचषकातील उपस्थितीबद्दल प्रश्न कसे उपस्थित करु शकतात. त्याच्या निवृत्तीबद्दल तो निवृत्ती का घेत नाही असे म्हणण्यापेक्षा तो निवृत्ती का घेत आहे, असे म्हणणे योग्य आहे.’

‘धोनी असा एकमेव आहे ज्याला निवृत्तीची योग्य वेळ माहित आहे आणि खेळाडू म्हणून त्याला ती माहित असते. त्याला विश्वचषकानंतर अजून पाचवर्षे खेळायचे असेल तरी तो खेळू शकतो. कारण त्याला त्याच्या निवृत्तीची योग्य वेळ माहित आहे. धोनी त्याला वाटेल तेव्हा निवृत्त होऊ शकतो. कारण तो तितका शानदार आहे.’

धोनी यावर्षी त्याचा चौथा विश्वचषक खेळत आहे. तसेच तो भारतीय संघातील सध्याचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहे. पण मागीलवर्षी त्याचा खराब फॉर्म असल्याने अनेकांनी त्याच्यावर टिका केली होती. मात्र यावर्षाच्या सुरुवातीपासूनच धोनी चांगल्या लयीत असून त्याने आत्तापर्यंत चार अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

तसेच त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला आहे. त्याचबरोबर त्याने या वर्षात ९ वनडे सामन्यात ८१.७५ च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत.

तो यावर्षी विश्वचषकापूर्वी पार पडलेल्या आयपीएलमध्येही चांगल्या लयीत खेळला असून तो चेन्नई सुपर किंग्सकडून यावर्षी सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने १५ सामन्यात ८३.२० च्या सरासरीने ४१६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच धोनीची यष्टीमागील कामगिरीही चांगली झाली आहे. त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीची पाठिंबा दिला आहे. 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक पुरुषांचा पण याबाबतीत महिलांनी घेतली आघाडी…

विश्वचषकाआधी भुवनेश्वर कुमारचा चाहत्यांना खास संदेश, पहा व्हिडिओ

पाकिस्तानचा स्टार फलंदाज म्हणतो, बुमराहने ती चूक केली नसती तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment