ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने मागच्या वर्षी 4 मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे वय अवघे 52 वर्ष असल्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असेलेल्या वॉर्नने आयपीएल ट्रॉफीही जिंकली आहे. शेन वॉर्न आयपीएच्या पहिल्या हंगामाचा विजेता कर्णधार होता.
आयपीएल स्पर्धा 2008 साली सुरू झाली होती आणि ही स्पर्धा आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीगपैकी एक बनली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते, ज्याचा कर्णधार शेन वॉर्न होता. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान संघाने सुरुवातीचे काही सामने गमावले होते, पण पुढे संघाने चांगले प्रदर्शन केले आणि विजेतेपदही पटकावले.
आयपीएल 2008 हंगाम सुरू होण्यापूर्वी वॉर्नचा राजस्थान रॉयल्स संघ इतर संघांच्या तुलनेत कमजोर दिसत होता, पण लीग स्टेजच्या १४ सामन्यांपैकी 11 सामने याच संघाने जिंकले. यानंतर संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला आणि उपांत्य सामन्यात दिल्ली डेयरडेविल्स (आत्ताचे नाव दिल्ली कॅपिटल्स) संघाला पराभूत करून राजस्थान संघ अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यात राजस्थान आणि एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने सामने होता.
अंतिम सामन्यात धोनीच्या सीएसकेने 163 धावा केल्या. यामध्ये सुरेश रैनाने 30 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. तसेच धोनीने शेवटच्या टप्प्यात 17 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. सामन्यातील संघर्ष शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाला. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकात 8 धावांची आवश्यकता होती. अखेरीत शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला.
यूसुफ पठाणने महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते. वॉर्नने या संपूर्ण हंगामात 15 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या होत्या. असे असले तरी, राजस्थान रॉयल्सला या हंगामानंतर एकदाही आयपीएलचे विजेतपद मिळवता आलेले नाही. मात्र, संघाने 2013, 2015, आणि 2018 मध्ये प्लेऑफ फेरी गाठली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लिजेंड वॉर्नी’चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा
शेन वॉर्नच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ; सर्वांपासून लपून रडायचा ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ टाकणारा फिरकीपटू