---Advertisement---

वेळ सांगून येत नाही! सकाळी ऑसी दिग्गजाच्या मृत्यूवर व्यक्त केला शोक अन् संध्याकाळी स्वत: वॉर्नही पोहोचला देवाघरी

On: शनिवार, मार्च 5, 2022 5:53 PM
Shane-Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर आणि जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक शेन वॉर्न (Shane Warne) याचे शुक्रवारी (४ मार्च) निधन झाले. वॉर्न थायलंडमध्ये त्याच्या प्रायवेट विलावर बेशुद्ध अवस्थेत मिळाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलवले, पण त्याचा जीव वाचवता आला नाही. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज रॉड मार्श (Rod Marsh) यांच्या निधनानंतर २४ तासांच्या आतमध्ये वॉर्नच्या रूपात ऑस्ट्रेलियन चाहत्यांना दुसरा मोठा झटका मिळाला आहे.

‘‘थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी वॉर्न कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले,’’ अशी माहिती वॉर्नच्या व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने दिली आहे. विशेष गोष्ट म्हणजे रॉड मार्शच्या निधनानंतर शेन वॉर्नने ट्वीटवर त्यांना श्रीद्धांजली दिली होती. त्यानंतर सुमारे १२ तासानंतर स्वतः वॉर्ननेही अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांना या गोष्टीच आश्चर्य वाटत आहेत आणि ते सोशल मीडियावर याविषयी व्यक्तही होत आहेत.

शेन वॉर्नने केलेले शेवटचे ट्वीट

शेन वॉर्न जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव होते. त्याच्या फिरकीच्या जाळत्या अनेक दिग्गज फलंदाज अनेकदा फसले. कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी १४५ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ७०८ खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीर पहिल्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या १९४ सामन्यांमध्ये वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वॉर्नच्या नावावर १३१९ विकेट्स आहेत.

आयपीएल स्पर्धेचा तो एक चॅम्पियन कर्णधार राहिला आहे. आयपीएल स्पर्धा २००८ साली सुरू झाली होती. या हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद मिळवले होते, ज्याचे कर्णधारपद शेन वॉर्न सांभाळत होता. जागतिक क्रिकेटमध्ये शेन वॉर्नचे अनेक विक्रम अजूनही अबाधीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

रिषभ ९६ धावांवर बाद होताच गावसकर, धोनी यांच्या ‘या’ विक्रमांशी झाली बरोबरी

फिरकीचा जादूगार गेला! आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

मिस यू किंग! वॉर्नच्या जाण्याने दुःखात बुडाले संघसहकारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---