ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने (Shane Warne) सध्याच्या काळातले कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज सांगितले आहेत. त्याने या ५ फलंदाजांच्या यादीत २ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, तर भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा प्रत्येकी एक खेळाडू निवडला आहे.
शेन वॉर्नने यादीतला पहिला फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा धडाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला घेतलं आहे. स्मिथला ऍशेस २०२१-२२ मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. सध्याच्या काळात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे.
शेन वॉर्न म्हणाला की, स्टीव्ह स्मिथकडे गोलंदाजांना उत्कृष्टपणे खेळण्याची क्षमता आहे. तो कुठल्याही परिस्थितीत धावा करतो. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ सध्या आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत (ICC Men’s Test Batting Rankings) दुसऱ्या स्थानावर आहे. स्मिथने आतापर्यंत ७८ कसोटी सामन्यात २७ शतक आणि ३१ अर्धशतकांसह ७५५२ धावा केल्या आहेत.
फॉक्स क्रिकेटवर बोलताना शेन वॉर्न म्हणाला, “माझ्याजवळ स्टीव्ह स्मिथ आहे. बऱ्याच काळापासून स्टीव्ह स्मिथ सर्व गोलंदाजांसमोर आक्रमक खेळत आहे.”
या यादीत दुसरा खेळाडू म्हणून शेन वॉर्नने जो रूटला (Joe Root) पसंती दिली. या यॉर्कशायरच्या खेळाडूने २०२१ वर्ष गाजवले आहे. त्याने ६ शतकांसह १५०० पेक्षा अधिर धावा केल्या आहेत. जो रुटनंतर शेन वॉर्नने या यादीत भारत आणि न्यूझीलंड संघाचे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियम्सन (Kane Williamson) यांना जागा दिली आहे.
वॉर्नचं असं म्हणणं आहे की, केन विलियम्सन त्याच्या सुसंगततेमुळे नेहमी यादीत असणार. पण वॉर्नला विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मची चिंता आहे. कारण विराटचं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये आलं होतं.
यानंतर यादीत पाचव्या क्रमांकावर कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीलाच आपली छाप सोडणाऱ्या मार्नस लॅब्युशेनला (Marnus Labuschagne) वॉर्नने समाविष्ट केलंय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या लॅब्युशेनने १९ कसोटी सामन्यात १९५९ धावा केल्या आहेत.
शेन वॉर्न म्हणाला, “दुसऱ्या क्रमांकावर जो रूट आहे, ज्याने यावर्षी ६ शतकं ठोकली आहेत. केन विलियम्सन या यादीत कायम असणार. विराट फक्त फॉर्मच्या काळजीमुळे खाली आहे आणि पाचवा खेळाडू म्हणून लॅब्युशेन सामील झाला आहे.”
विशेष म्हणजे वॉर्नने निवडलेल्या ५ फलंदाजांपैकी पहिले चारही खेळाडूंचा फॅब फोरमधील आहेत. रुट, स्मिथ, विराट आणि विलियम्सन हे ४ फलंदाज सध्याचे फॅब फोर म्हणून ओळखले जातात.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”
ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर
हेजलवूड चाहत्याच्या फिरकीवर बोल्ड! चक्क चूक झाल्याच्या कबुलनाम्यावर केली स्वाक्षरी