अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने 246 चेंडूत 123 धावांची शतकी खेळी केली. यावेळी त्याचे ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने ट्विटरवर अभिनंदन केले.
“इंग्लंडमधील यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळल्याने मला ही शतकी खेळी करताना फायदा झाला”, असे म्हणत पुजाराने या शतकाचे श्रेय कौंटी क्रिकेटला दिले.
यॉर्कशायरच्या ड्रेसिंग रूममध्ये पुजाराला स्टिव्ह म्हटले जाते हे वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये सांगितले. तसेच त्याला स्टिव्ह हे नाव काय दिले, या मागचे कारणही वॉर्नने स्पष्ट केले आहे.
“पुजाराने (स्टिव्ह) उत्कृष्ठ खेळी केली असून यॉर्कशायरच्या खेळाडूंना त्याचे नाव बोलण्यास अवघड जात असल्याने त्यांनीच त्याला स्टिव्ह हे नाव दिले आहे”, असे ट्विट करत वॉर्नने त्याचे अभिनंदन केले.
Terrific innings from Pujara or “Steve” as the Yorkshire men called him as they couldn’t pronounce his first name Cheteshwar ! Congrats on a great 💯 👍
— Shane Warne (@ShaneWarne) December 6, 2018
2015मध्ये पुजाराने यॉर्कशायरकडून दोन सामने खेळले आहेत. तसेच तो डर्बीशायर आणि नॉटींगघमशायरकडूनही काऊंटी क्रिकेट खेळला आहे.
“कसोटी क्रिकेटमधील ही माझी सर्वात उत्तम खेळी ठरली आहे. माझे संघसहकारीही असेच म्हणत आहे”, असे पुजाराने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!
–चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार
–चेतेश्वर पुजारा-राहुल द्रविड बाबतीत घडला बाप योगायोग!