मुंबई । शेन वॉर्न आणि वाद हे जणू आजकाल समीकरणच बनले आहे. वॉर्नचे अनेक महिलांशी संबंध असल्याने तो नेहमीच चर्चेत येत राहतो. आता त्याच्यावर आपल्या बेस्ट फ्रेंडच्या मैत्रिणीसोबत संपर्क ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २०१५ ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा मायकेल क्लार्क हा शेन वॉर्नचा बेस्ट फ्रेंड आहे.
मायकेल क्लार्कने २०१२ साली ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री आणि टीव्ही निवेदिका कायली बोल्डी हिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांना एक चार वर्षाची मुलगी देखील आहे. तरीही मायकेल क्लार्क सेकेट्री हिच्यासोबत संबंध ठेवत होता. त्यामुळे मायकेल क्लार्क आणि कायली यांचा घटस्फोट झाला.
परंतु आता शेन वाॅर्न कायलीबरोबर फ्लर्ट करत असल्याच्या चर्चा आहे. तसेच त्याने गेल्या काही दिवसांत कायली बोल्डीचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर लाईक्स केले आहेत.
https://www.instagram.com/p/CAkSlozgAbz/
ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्नचे सिमोन कॅलहन हिच्यासोबत १९९५ साली लग्न झाले होते. याच दरम्यान वॉर्नने अनेक महिलांशी संबंध ठेवल्याने निराश झालेल्या सिमोनने २००५ साली त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनाही ब्रुक समर आणि जॅक्सन अशी तीन मुले आहेत.
मुलांच्या भवितव्याचा विचार करून शेन वॉर्न आणि त्याची पत्नी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. वॉर्न आणि एलिझाबेथ हर्ले यांच्यातील मैत्री संबंधांमुळे वॉर्नच्या पत्नीने २०१० साली वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर वॉर्न आणि एलिझाबेथ हे तीन वर्षे एकसाथ राहिले. २०१४मध्ये वॉर्न आणि हर्ले यांच्या मैत्रीत कटुता आल्यानंतर वॉर्नने लाँजरी मॉडेल आणि डीजे एमिली स्कॉट यांना डेट करायला सुरू केले होते.