मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा १३ मार्च रोजी संपणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडसमितीची मुंबई येथे यासाठी बैठक होणार आहे. संघ निवडताना निवडसमितीची मुख्यकरुन विश्वचषक २०१९चा विचार करुनच संघ निवड करणार आहे.
या संघात रिषभ पंतची निवड होण्याची शक्यता आहे. तसेच विश्वचषकात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकपैकी एका यष्टीरक्षकाची निवड धोनीबरोबर राखीव यष्टीरक्षक म्हणून होऊ शकते.
एका मुलाखतीत शेन वाॅर्नने रिषभ पंतचे जोरदार कौतूक केले. तसेच धोनी आणि पंत या दोघांचाही विश्वचषकात समावेश व्हावा असे मतं मांडले.
रिषभ पंत एक प्रतिभाशाली क्रिकेटर आहे. त्याचा विचार टीम इंडियाने एक सलामीवीर म्हणून करावा. त्याने रोहितसह सलामीला फलंदाजी केली तर ते बाकी संघांसाठी धक्कादायक ठरेल. असे असले तरी शिखर धवन सध्या चांगली कामगिरी करत आहे. जर भारत विश्वचषकात काही वेगळीच व्युवरचना घेऊन उतरला तर अनेक संघ संकटात सापडतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा