मुंबई । शनिवारी(२२ ऑगस्ट) चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये दाखला झाला होता. पण त्यानंतर काही दिवसातच सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला. रैना यावर्षी संपूर्ण आयपीएल स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. तो नेहमीच सीएसकेचा महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघासाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे संघ सहकारी खेळाडूंनी रैनाला मिस करण्यास सुरुवात केली आहे. शेन वॉटसनने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये शेन वॉटसन म्हणाला की, ”तू संघात नसल्याने संपूर्ण सीएसके टीम तुला मिस करेल. तू संघाची जान आहेस. यावेळी आम्ही सर्व असे काही करू ज्यामुळे तुला अभिमान वाटेल. तू सुरुवातीपासूनच संघाचा भाग आहेस आणि तू या संघाची सर्वात मोठी ताकद आहेस. आम्ही आशा करतो की तू सुरक्षित प्रवास करशिल. तू आनंदी आणि सुरक्षित राहा ”
व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि ते सर्व काही करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यामुळे इतर लोक त्यापासून सुरक्षित राहू शकतील. आयपीएल ही सर्वात मोठी टी -20 लीग असून चाहत्यांसह खेळाडूंनाही ही लीग व्हावी अशी इच्छा आहे. सर्व खेळाडू बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहेत.
https://www.instagram.com/p/CEeBAo-gf1O/
प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार, रैनाचा जवळचा नातलग रूग्णालयात गंभीर अवस्थेत आहे, तर त्याच्या काकांचा मृत्यू झाला आहे. पठाणकोटच्या थरियल गावात मध्यरात्री त्याच्या नातेवाईकांवर हल्ला झाला. हा हल्ला 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास झाला होता. तेव्हा हे कुटुंब त्यांच्या घराच्या छतावर झोपले होते. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त ४२ डावात मिळवला अव्वल नंबर; भारताच्या या दिग्गजाने केला होता हा पराक्रम
तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून
तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता