---Advertisement---

भर मैदानात इशांत, रबाडाचे वाॅटसनबरोबर झाले वाद, या खेळाडूने केली मध्यस्थी

On: बुधवार, मार्च 27, 2019 5:59 PM
---Advertisement---

दिल्ली। भारतात सध्या आयपीएलची स्पर्धा रंगत चालली आहे. आयपीएल म्हटले की खेळाडूंमधील वाद हे काही नवे नाही. अशीच खेळाडूंमधील शाब्दिक चकमक मंगळवारी फिरोज शहा कोटला मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात पार पडलेल्या सामन्यात पहायला मिळाली.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज शेन वॉटसन आणि दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज इशांत शर्मा आणि कागिसो रबाडा यांच्यात ही शाब्दीक चकमक झाली होती.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करत असताना चेन्नईचा फलंदाज अंबाती रायडूला इशांत शर्माने तिसऱ्या षटकात बाद केले.

यावेळी या विकेटचे इशांतने जोरदार सेलिब्रेशन केले. ते पाहुन वॉटसनला हसू आले. मात्र वॉटसनला हसताना पाहून इशांत भडकला. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. अखेर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मध्यस्थी करत त्यांना दूर केले.

त्यानंतर काही वेळात रबाडा गोलंदाजी करत असताना पून्हा एकदा वॉटसन आणि रबाडामध्ये वाद झाले. त्यावेळी रबाडा उभ्या असलेल्या ठिकाणाच्या जवळून जात वॉटसनने एकेरी धाव घेतली. यावेळी वॉटसनने तो फक्त धाव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले, त्यावर रबाडाने उपहासात्मक टाळ्या वाजवल्या.

https://twitter.com/AnkushD86744515/status/1110589803010105345

पण अखेर सामना संपल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगने  रबाडा आणि वॉटसनमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर रबाडा आणि वॉटसन एकमेकांशी चर्चा करताना आणि हसतानाही दिसले. त्यावेळी त्यांनी फोटोही काढले.

याचा व्हिडिओ आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना म्हटले आहे की  ‘दिवसाच्या अखेर सर्व काही चांगले झाले.’

या सामन्याचा सामनावीर पुरस्कार शेन वॉटसनला देण्यात आले. त्याने 26 चेंडूत 44 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच धोनीने 32 सुरेश रैनाने 30 आणि केदार जाधवने 27 धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयाला हातभार लावला. तत्पूर्वी चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दिल्लीकडून शिखर धवनने 47 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 147 धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान चेन्नईने 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कमॉन पापा’ म्हणत कॅप्टन कूल धोनीला चिअर करणाऱ्या झिवाचा व्हिडीओ व्हायरल

आयपीएल सामन्यादरम्यान चौकीदार चोर हैं घोषणांनी स्टेडियम दणाणले

युवराज सिंगच्या एक पाऊल पुढे निघाला हा मुलगा, ठोकले ७ चेंडूत ७ षटकार..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment