---Advertisement---

शार्दुलच्या विचित्र पण भन्नाट शॉटला पाहून ड्रेसिंग रूममध्ये आनंदाची लहर; विराटच्या तोंडून निघालं, ‘व्वा!’

Shardul-Shot-Kohli_reaction
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या सुरू आहे. हा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघासाठी हा सामना कसाही राहिला असो, पण शार्दुल ठाकुर (shardul thakur) साठी हा सामना खास राहिला आहे. शार्दुलने सामन्याच्या पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले, तर दुसऱ्या डावात फलंदाजीतही चांगली खेळी केली. यादरम्यान त्याने एक शॉट असा मारला, जो पाहून भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली देखील हैराण झाला.

शार्दुल या सामन्याच्या पहिल्या डावात पाच चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाला होता. परंतु दुसऱ्या डावात त्याने २४ चेंडूंमध्ये २८ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. दुसऱ्या डावात त्याने फलंदाजी करताना अनेक मोठे शॉट देखील खेळले. यादरम्यान त्याने एक असा शॉट मारला, जो पाहून संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कर्णधार विराट कोहलीने तर वाव (wow) अशी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलने हा शॉट पॉईंटच्या दिशेने खेळला होता आणि तो खेळण्यासाठी त्याने स्वतःचे दोन्ही पाय पूर्णपणे खोलले होते.

त्याने मारलेला हा अनोखा शॉट पाहून, चाहत्यांना हसू आवरले नाही. ड्रेसिंग रूममधील एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहलीसोबत मयंक अगरवाल, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दिसत आहेत. हे सर्वजण शार्दुलने मारलेला शॉट पाहून आनंदी झाल्याचे दिसते.

https://twitter.com/SushantNMehta/status/1478681660623261696

दरम्यान, उभय संघात खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात २०२ आणि दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करून माफक आघाडी घेतली होती. आता विजयासाठी त्यांना शेवटच्या डावात २४० धावांची लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफ्रिकी संघाने दोन विकेट्सच्या नुकसानावर ११८ धावा केल्या आणि अजून १२२ धावा आवश्यक आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अति शहानपणा नडला! ‘तोंड बंद ठेव’, म्हणत द. आफ्रिकी गोलंदाजाला भिडला अन् असा तोंडघशी पडला

स्टंपमाइकमध्ये कैद झाली मयंक अगरवालची स्लेजिंग; डीन एल्गारला म्हणाला, ‘स्वार्थी कर्णधार’- Video

आजच्याच दिवशी १५ वर्षीय मुंबईकराने घातलेला धावांचा रतीब, एकाच डावा चोपलेल्या नाबाद १००९ धावा

व्हिडिओ पाहा –

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---