भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इतिहास रचला आहे. संघ कठीण परिस्थितीत असताना खेळायला आलेल्या ठाकूरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत उपयुक्त डाव खेळला. त्याने आक्रमक फलंदाजी करत केवळ 31 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याने माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा विक्रम मोडला आहे. त्याच्या या कारनाम्यानंतर स्वत: सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शार्दुल ठाकूरने सामन्यादरम्यान 36 चेंडूत 57 धावांची वेगवान खेळी खेळली. त्यातही त्याने अवघ्या 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 158 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह धावा आल्या. त्याने त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकारही मारले. ठाकूरने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. सोबतच त्याने उमेश यादवसोबत 63 धावांची भागीदारी देखील रचली. यासह तो भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, आदी दिग्गजांची नावे आहेत. यात कपिल देव पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी कराचीत पाकिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक केले. ठाकूरने 31 चेंडूत हा पराक्रम केला आहे. जर त्याने दोन चेंडू कमी खेळून अर्धशतक केले असते, तर तो या यादीत पहिल्या स्थानावर आला असता.
शार्दुल कपिल देव यांचा विक्रम मोडण्यात अपयशी झाला असेल, पण त्याने माजी सलामीवीर सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 32 चेंडूत अर्धशतक केले होते. शार्दुलने आपला विक्रम मोडीत काढल्यानंतर सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या सेहवागने प्रतिक्रिया दिली.
शार्दूलच्या अर्धशतकावर तो म्हणाला की, “शार्दूलचा हा डाव माझ्या खेळीपेक्षा खूप पुढे आहे. मी डावाची सुरुवात अर्थातच सलामीला फलंदाजी करताना जलद अर्धशतक केले होते. पण शार्दुलने अशा परिस्थितीत पन्नाशीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जेव्हा संघ कठीण परिस्थितीत होता. मला त्यावेळी चूक करण्याची संधी होती. कारण फलंदाजीसाठी संपूर्ण संघ मागे होता. पण शार्दुलला तसे करायची संधी नव्हती.”
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानातील कट्टर वैरींमध्ये ओव्हल कसोटीत दिसला ‘याराना’, कोहली-अँडरसनच्या फोटोंनी चर्चेला उधाण
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल
संयमी अर्धशतकासह कोहली धोनीवर ठरला वरचढ, बड्या विक्रमात बनला ‘कॅप्टन नंबर १’