आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची कामगिरी संमिश्र झाली आहे. त्यांचे स्पर्धेतील आव्हान अद्याप संपुष्टात आले नसले तरी, उर्वरित तीनही सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागेल. अशा स्थितीत संघाचा प्रमुख अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा गोलंदाजी करताना दिसत नाही. संघाला काही अंशी गरज असताना आपण का गोलंदाजांनी करत नाही, याबाबत त्याने स्वतः खुलासा केला.
आयपीएल 2023 साठी केकेआरने त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून मोठी रक्कम देत ट्रेड केले. मात्र, या हंगामात त्याची कामगिरी तितकी प्रभावी झाली नाही. आरसीबी विरुद्ध एक सामना वगळता तो कमाल दाखवू शकला नव्हता. अशात आता तो गोलंदाजी देखील करत नसल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“मला छोटीशी दुखापत झाली होती. त्यामुळे मी काही सामने खेळू शकलो नाही. मी पुनरागमन केले तेव्हा गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नव्हतो. आता मला चेंडू दिला गेला तर मी नक्कीच संघासाठी चांगली कामगिरी करेल.”
तसेच केकेआर संघात अधिक अष्टपैलू खेळाडू असल्याने कर्णधारासाठी पर्याय खुले होतात, असे देखील त्याने पुढे बोलताना म्हटले.
शार्दुलने या हंगामात 9 सामने खेळताना 109 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा देखील समावेश होतो. तसेच चार बळी मिळवण्यात देखील त्याला यश आले आहे
शार्दुल याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त राहण्याकरता काही काळ गोलंदाजीपासून रोखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा प्रकारचे वृत्तसमोर आले होते. शार्दुल हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातील एकमेव वेगवान गोलंदाजी अष्टपैलू आहे. त्यामुळे आणखी 11 मध्ये त्याचा समावेश होऊ शकतो.
(Shardul Thakur Clear Why He Not Bowling For KKR In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली बाहेर होणार की चेन्नई ठरणार वरचढ? आयपीएल 2023 मध्ये बुधवारी निर्णायक झुंज
मैं हू ना! 200 धावा चेस करताना सूर्या तळपतोच, पाहा ही जबरदस्त आकडेवारी