---Advertisement---

“हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे”

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 11:15 AM
Shardul Thakur Hardik Pandya
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या विस्मरणीय कामगिरीनंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते टेस्ट स्पेशालिस्ट व्हीव्हीएस लक्ष्मणपर्यंत सर्वांनी शार्दुलचे कौतुक केले.

अष्टपैलूची भूमिका निभावल्याबद्दल शार्दुल ठाकूरचे माजी सलामीवीर आकाश चोप्राने देखील कौतुक केले आहे. शार्दुलच्या कसोटी क्रिकेटमधील प्रगतबद्दल देखील त्यानी भाष्य केले आहे. हार्दिक पंड्याचे भारतीय संघातून बाहेर पडणे आणि रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यात पाहुण्यांसाठी अष्टपैलू खेळाडूसाठी पोकळी निर्माण झाली होती. अशा स्थितीत आकाश चोप्राने दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शार्दुलने पंड्याची जागा कशी घेतली, हे सांगितले.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, शार्दुल ठाकूरने निवडकर्त्यांसमोर स्वत:ची निवड करण्याचे ठोस कारण दिले आहे. तो म्हणाला, “आपण हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे. आपण हार्दिककडे पुन्हा पुन्हा पाहत होतो की, तो गोलंदाजी करेल आणि बॅटने धावा करेल, पण आता हे सर्व शार्दुल ठाकूर करत आहे.”

अधिक वाचा – ‘लॉर्ड’ उपाधी मागील खरे कारण काय? का मिळतंय घवघवीत यश? शार्दुल ठाकूरनेच केलाय खुलासा

शार्दुल ठाकूरने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात सात विकेट घेत विक्रमी कामगिरी केली. यानंतर या वेगवान गोलंदाजाने वाँडरर्स स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी आपले फलंदाजीचे कौशल्यही दाखवले. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात २४ चेंडूत २८ धावांची स्फोटक आणि महत्त्वाची खेळी खेळली.

मात्र, असे असले तरी भारताला दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर संपुष्टात आल्याने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने ६७.४ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर पतीसाठी रितिकाची हटके कमेंट; म्हणाली, ‘रोहितला माझ्याकडून…’

नामुष्कीजनक पराभवाचे कर्णधार राहुलने दिले ‘हे’ कारण; म्हणाला…

केवळ २२ वर्षीय गोलंदाजाने घेतला वनडे क्रिकेटमधून ‘ब्रेक’; बुमराहशी होते तुलना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---