टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. येथे १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे दोन्ही देशांदरम्यान कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ लीसेस्टरशायरविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामना खेळत आहे. गुरुवारी सराव सामन्याचा पहिला दिवस होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार रोहित शर्मा २५, शुभमन गिल २१, हनुमा विहारी ३, श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाले. विराट कोहलीही मोठी खेळी खेळून चुकला आणि खालच्या फळीत आलेला रवींद्र जडेजा फलंदाजीत फार काही करू शकला नाही.
भारताने १३८ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. आठव्या क्रमांकावर उतरलेल्या शार्दुल ठाकूरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण, तोही 6 धावा करून बाद झाला. त्याला रोमन वॉकरने आपला बळी बनवले. रोमनचा हा चेंडू इनस्विंगर होता. जे शार्दुलला नीट वाचता आले नाही आणि चेंडू बाहेर येईल या विचाराने त्याने एकही शॉट खेळला नाही आणि बॅट उचलली. पण, चेंडू झटपट आत आला आणि यष्टी उधळला. केवळ शार्दुलच नाही, तर बाकीचे खेळाडूही त्याच्या बाद झाल्याने थक्क झाले. ही घटना भारतीय डावाच्या ४३व्या षटकात घडली. शार्दुलला केवळ ६ धावा करता आल्या.
☝️ | Thakur (6) bowled Walker. 🎳
The @BCCI all-rounder shoulders arms to a straight one that goes on to crash into the stumps.
5⃣-fer for @RomanWalker17. 👏
🇮🇳 IND 148/7
𝐋𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐑𝐄𝐀𝐌: https://t.co/adbXpwig48 👈
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/8i479wIaKb
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) June 23, 2022
पहिल्या दिवशी भारताने ८ विकेट गमावल्या
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २४६ धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतने सर्वाधिक ७० धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. शेवटच्या काही षटकांमध्ये उमेश यादवने निश्चितच काही चांगले फटके खेळले आणि 32 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. त्याच्यानंतर विराट कोहलीने ३३ धावांची खेळी खेळली. तो एलबीडब्ल्यू आऊट झाला.
मात्र, कोहली या निर्णयावर खूश नव्हता. लेस्टरशायरकडून रोमन वॉकरने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने रोहित शर्मा, हनुमा विहारी, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी रोमन वॉकरने ११ षटके टाकली आणि अवघ्या २४ धावांत ५ बळी घेतले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओडिशा सरकारने अल्टीमेट खो खो व्यावसायिक लीगमध्ये घेतली पाचव्या संघाची मालकी
आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेल्या पंचावर ओढावलीय चपला विकण्याची वेळ, पण का?
धोनीच्या शिष्याने केली लाजिरवाणी हरकत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भरेल संताप