भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताचा गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकुरला एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेले आहे. हार्दिक पंड्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्यामुळे हार्दिकला संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. अशातच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिशनेही शार्दुल आणि हार्दिकविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंड संघाचा माजी दिग्गज स्कॉट स्टायरिश (Scott Styris) याच्या मते मते शुर्दुल ठाकुर (Shardul Thakur) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यात जर तुलना झाली, तर हार्दिक शार्दुलपेक्षा चांगले प्रदर्शन करू शकतो. शार्दुलची खासियत हीच आहे की, तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्ये देखील संघाला महत्वाचे योगदान देऊ शकतो. माध्यमांशी बोलत असताना स्कॉट स्यायरिशला प्रश्न विचारला गेला की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये शार्दुलला खेळण्याची संधी मिळायला हवी की नाही?
या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की, “शार्दुल ठाकुरचा फायदा हाच आहे की, तो फलंदाजीही करू शकतो. पण त्याचे नुकसान हे आहे की, हार्दिक पंड्या अष्टपैलूच्या भूमिकेत पुढे यत आहे. तुम्हाला एकाच पद्धतीच्या दोन खेळाडूंची गरज आहे का ?, कारण शार्दुल ठाकुर एवढा चांगला नाहीये, जेवढा की हार्दिक पंड्या आहे. मी त्याला अष्टपैलू मानत नाही.”