आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकाला पुढच्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामील केले गेले आहे. हार्दिक मागच्या काही काळापासून कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. विश्वचषकामध्ये तो खेळू शकेल याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. अशात शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी विश्वचषकात संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
हार्दिकऐवजी शार्दुलला मिळेल संधी
हार्दिकच्या फिटनेसबाबद प्रश्न उपस्थित होत असताना विश्वचषकासाठी शार्दुल ठाकूरच्या नावाची चर्चा होत आहे. हार्दिक आयपीएलमध्ये खेळताना दिसेल असे वाटत होते, पण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो नव्हता. तिसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली गेली होती, पण तो काही खास कमाल करू शकला नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकामध्ये तो खेळेल याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. तो विश्वचषकामध्ये खेळला नाही, तर शार्दुलला संघात स्थान दिले जाऊ शकते. शार्दुल सध्या चांगल्या फार्ममध्येही आहे आणि त्याला विश्वचषकासाठीच्या संघामध्ये स्टॅंडबाय खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. हार्दिक विश्वचषकात खेळला नाही, तर त्याला भारताच्या १५ सदस्यीय संघात सामील केले जाईल.
इंग्लंविरुद्ध कसोटी मालिकेतही शार्दुलने केले होते उत्कृष्ट प्रदर्शन
शार्दुल नुकत्याच इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. त्याने या मालिकेत चार पैकी दोन सामने खेळले. या दोन सामन्यात त्याने तीन डावांमध्ये ३९.०० च्या सरासरीने १०२.६३ च्या स्ट्राईक रेटने ११७ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन अर्धशतकेही झळकावली होती. मालिकेत शार्दुलने अजिंक्य रहाणेपेक्षा जास्त धावा केल्या. रहाणेने केवळ १०९ धावा केल्या होत्या.
शार्दुलने इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाजीतही चांगले प्रदर्शन केले होते. त्याने खेळलेल्या दोन सामन्यात त्याने २२.०० च्या सरासरीने ७ विकेट्स मिळवल्या होत्या. यामध्ये त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात, २२ धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. मालिकेत शार्दुलने रवींद्र जडेजापेक्षा चांगली कामगिरी केली होती. जडेजाने पूर्ण मालिकेत एकूण ६ विकेट्स मिळवल्या होत्या.
हार्दिकच्या फिटनेसविषयी तक्रार आजूनही कायम
दरम्यान हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांनंतर आयपीएमध्ये खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्याची वाट पाहत होते. मात्र, हार्दिक पिहिल्या दोन्ही सामन्यात तो खेळला नाही. यानंतर त्याच्या फिटनेसवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले. हार्दिक आरसीबीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळला, पण मुंबई इंडियन्ससाठी काही खास कामगिरी करू शकला नाही.
मुंबई इंडियन्सचे क्रिकेट निर्देशक झहीर खान आरसीबीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हार्दिकच्या फिटनेसविषयी माहिती दिली होती. तो म्हणाला होता, “आम्ही सराव सत्र घेऊ आणि पाहू, त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल. हार्दिकने सराव सुरू केला आहे आणि सध्या एवढीच माहिती आम्ही देऊ शकतो. आम्हाला आशा आहे की, तो फिट होईल आणि आरसीबीविरुद्ध सामन्यात उपस्थित असेल.”
माजी भारतीय क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न
भारताचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी पुढच्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर शंका असतानाही त्याला भारतीय संघात सामील केल्यामुळे प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्याम, मागच्या वर्षी हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो खेळण्यासाठी तयार होईल असा अंदाज होता, पण अजूनतरी तसे दिसले नाही. त्याने शस्त्रक्रियेनंतर क्वचितच गोलंदाजी केलेली दिसली आहे. त्यामुळे त्याला विश्वचषकात गोलंदाजी करता येईल की नाही याबाबत शंका कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष