भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघासाठी किपायतशीर ठरला. वनडे मालिकेती शेवटच्या सामन्यात त्याने 4, तर संपूर्ण मालिकेत 8 विकेट्स घेतल्या. मागच्या दोन वर्षांपासून त्याला भारताच्या वनडे संघात नियमित स्थान मिळत आले आहे. याच पार्श्वभूनीवर शार्दुलने वेस्टइंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर खास प्रतिक्रिया दिली.
भारत आणि वेस्ट इंडीज (Shardul Thakur) यांच्यातील तिसरा वनडे सामना पाहुण्या भारतीय संघाने 200 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका देखील 1-2 अशा अंतराने नावावर केली. शेवटच्या सामन्यात शार्दुलने 6.3 षटकात 37 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हे त्याचे सर्वोत्तम वनडे प्रदर्शन ठरले. त्याचे वनडे क्रिकेटमधील सातत्य पाहता आगामी वनडे विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पण संघात निवड झाली नाही, तरीही काही करू शकत नाही, असे शार्दुल म्हणाला. सोबतच संघातील स्थान टिकवण्यासाठी खेळत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर शार्दुल ठाकूर म्हणाला, “जेव्हा कदी मला संधी मिळते, तेव्हा मी संघाच्या यशासाठी योगदान देत असतो. हीच माझी विचारसरणी आहे. मग मी गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करत असलो, तरी ही गोष्ट लागू होते. मी त्या खेलाडूंपैकी नाहीये, जे संघातील आपल्या जागेसाठी खेलतात. जर त्यासाठी खेळलो, तर मला प्रदर्शन करता येणार नाही. जर मला त्यांनी विश्वचषकासाठी निवडले नाही, तर हा त्यांचा निर्मय असेल. मी यात जास्तकाही करू शकत नाही. आपल्या जागेसाठी खेळणे, हा विचार करणेही माझ्यासाठी चुकीचे आहे. मला वैयक्तिक यशाचा काही फरक पडत नाही. मी हे वारंवार सांगत असतो, काहीही झाले तरी मी संघासाठी खेळण्याचा आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल.”
दरम्यान, मागच्या मोठ्या काळापासून भारतीय वनडे संघाचा नियमित खेळाडू असणाऱ्या शार्दुलला मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडले गेले नव्हते. या मालिकेत का संधी मिळाली नाही, हे स्वतः शार्दुलला देखील अद्याप समजले नाहीये. (Shardul Thakur reaction about his place in the team)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या वनडे वॉटरबॉय, तर तिसऱ्या वनडेत अचानक फिल्डर बनला विराट, सामना पाहणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ
ऐकलंत का… हुकमी एक्का परततोय! विश्वचषकापूर्वी राहुलची विकेटकीपिंगला सुरुवात, व्हिडिओ पाहाच