वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडला 9 विकेट्सने पराभूत केले आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने उत्तम कामगिरी केली आहे.
शार्दुलने दुखापतीमधून परतताना रणजीमध्ये चांगले पुनरागमन केले आहे. मुंबईकडून खेळताना त्याने छत्तीसगड विरुद्ध 79 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. तरीही त्याला भारतीय संघनिवड अधिकाऱ्यांनी संधी दिली नसल्याने त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“या सामन्यानंतर भारतीय संघनिवड अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही”, असे शार्दुल म्हणाला आहे. तसेच या सामन्यावेळी कोणताच संघनिवड अधिकारी उपस्थित नव्हता हे लक्षात आले. मात्र त्याच्या या विधानाला बीसीसीआयने नकार दर्शवला आहे.
“रणजीमधील पुनरागमनानंतर संघ निवड अधिकाऱ्यांनी शार्दुलशी संपर्कात आहे. त्याला आम्ही इंडिया ए संघासाठी फिट राहण्यास सांगितले आहे”, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
इंग्लंड लायन भारत दौऱ्यावर येणार असून 23 जानेवारीपासून ते इंडिया ए विरुद्ध कसोटी आणि मर्यादित षटकाचे सामने खेळणार आहेत.
शार्दुलला तो पूर्णपणे फीट नसल्याची जाणीव आहे. यासाठी तो प्रयत्नही करत आहे असे त्याने म्हटले आहे.
“माझ्या गोलंदाजीचा हवा तसा वेग नसून मी सध्या 90% फीट आहे. हळूहळू मी माझी पूर्वीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे शार्दुल म्हणाला
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात शार्दुलने भारतीय संघात पदार्पण केले होते. मात्र 10 चेंडू टाकल्यानंतर त्याला मांड्यांचे स्नायू दुखावल्याने संघाबाहेर जावे लागले होते. तर पाच वन-डे सामन्यात खेळताना त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–गिरे तो भी टांग उपर! ही काही सर्वोत्तम टीम इंडिया नाही, माजी खेळाडूची जोरदार टीका
–हा फिरकीपटू असणार विश्वचषकात टीम इंडियाची पहिली पसंत
–विजयाच्या आनंदात शास्त्री- कोहलींकडून घडली मोठी चूक