मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 8 बाद 258 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून 141 धावांची तर भारताला विजयासाठी 2 विकेट्सची गरज आहे.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा झेल घेत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला आहे. पेनने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू पेनच्या बॅटची कड घेत सरळ पंतच्या दिशेने गेला. पंतनेही चूक न करता तो योग्यरितीने झेलला.
Sharp from Pant behind the stumps and India are closing in on victory at the 'G!#AUSvIND | @bet365_aus pic.twitter.com/hxWY6zPvuv
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2018
याआधी या सामन्यातील पंत आणि पेनमध्ये झालेली शाब्दिक चकमक सर्वांना स्टंपमाईकमधून ऐकू आली होती. यामध्ये पेनने भारताच्या दुसऱ्या डावात पंतला स्लेजिंग केले होते. त्यावेळ पेन पंतला म्हणाला होता की आता एमएस धोनी भारताच्या वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे पंत बीबीएलमधील होबार्ट हेरिकेन्स संघाकडून खेळू शकतो.
Tim Paine doing some recruiting for the @HurricanesBBL out in the middle of the 'G… 😂 #AUSvIND pic.twitter.com/6btRZA3KI7
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2018
या नंतर पंतनेही जेव्हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला तेव्हा पेन फलंदाजीला आल्यावर स्लेज करताना त्याला डिवचले होते. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला टेम्पररी कर्णधार माहीत आहे का? पेनचा हा स्पेशल अपरेन्स आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला.
It was Rishabh Pant's turn for some fun on the stump mic today… #AUSvIND pic.twitter.com/RS8I6kI55f
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2018
त्यामुळे त्यांच्यातील या गमतीशीर शाब्दिक चकमकीचा सर्वांनीच आनंद घेतला. त्यांच्यातील हा संवाद ऐकून समालोचकांनाही हसू आवरता येत नव्हते.
विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही संघाच्या दुसऱ्या डावात या दोघांनी एकमेकांचे यष्टीमागे झेल घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–जेव्हा तूला कॅंटीन सुरु कराव लागले तेव्हा मयांक काॅफी प्यायला येईल- शास्त्री
–मेलबर्न कसोटीत खेळत असेल्या खेळाडूच्या भावाला अटक
–रिषभ पंतने केला टीम पेनचा कालचा हिशोब चुकता, पहा व्हिडीओ