आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी प्रत्येकी २ वर्षांच्या २ कार्यकाळानंतर आता अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत नव्या अध्यक्षाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपअध्यक्ष इम्रान ख्वाजा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.
भारतीय असणारे मनोहर यांची २०१६ ला आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ ला त्यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच त्यांना पुन्हा एकदा आणखी २ वर्षे अध्यक्षपदावर कायम राहण्याची संधी होती. परंतू त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या नियमानुसार एका सदस्याला जास्तीत जास्त ३ कार्यकाळापर्यंत पदावर राहता येते.
आता अध्यक्ष निवडीची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यात आयसीसी घेण्याची शक्यता आहे. या अध्यक्षपदाच्या शर्यतीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुखे कोलिन ग्रेव्स अग्रेसर असल्याची चर्चा आहे. त्यांना इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचा पाठिंबा आहे. तसेच बीसीसीआयशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु अजून बीसीसीआयने त्यांना खुला पाठिंबा दिलेला नाही.
याबरोबर आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे नावही चर्चेत आहे. शशांक यांचे अनेक निर्णय बीसीसीआयच्या विरोधात असल्याने त्यांच्याशी बीसीसीआयचे संबंध बिघडलेले होते.
आता मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु सावनी म्हणाले, “आयसीसी बोर्ड आणि कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट कुटुंबाच्या वतीने मी शशांक यांचे नेतृत्व आणि त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून खेळासाठी जे काही केले त्याबद्दल आभार मानतो. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आहोत.”
तसेच ख्वाजा म्हणाले, “आयसीसी बोर्डावरील प्रत्येकजण शशांक यांचे त्यांनी आपल्या खेळाबद्दल दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल मनापासून आभार मानतो. शशांक यांनी खेळासाठी जे काही केले त्याबद्दल कृतज्ञतेचे ऋण हे क्रिकेटवर आहे, यात शंका नाही. त्यांनी क्रिकेट आणि आयसीसीला चांगले स्थान मिळवून दिले.”
ट्रेंडिंग घडामोडी –
स्मशानात सराव करणाऱ्या व्यक्तीचे गांगुलीमुळे बदलले नशीब, आज आहे टीम इंडियाचा मॅच विनर मोहरा
आपल्याच संघातील क्रिकेटर मित्राच्या बायकोचा बलात्कार करणारा क्रिकेटर…
हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात कसोटीत करणार धमाका, कारण की…