पंजाब किंग्सने आयपीएल 2025 साठी दोन खेळाडू कायम ठेवले आहेत. यामध्ये शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे. दोघांना अनुक्रमे 5.5 कोटी आणि 4 कोटी रुपये किंमतीत कायम ठेवण्यात आले आहे. आता स्फोटक फलंदाज शशांकने संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले. 32 वर्षीय खेळाडूने सांगितले की, आता संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची आहे.
‘मी त्यांना बरोबर सिद्ध करेन’
आयपीएलच्या मागील हंगामात पंजाब किंग्स उत्कृष्ट फिनिशर म्हणून उदयास आला होता. त्याने पंजाब किंग्जकडून 14 सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने 354 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 164.65 होता. संघ व्यवस्थापन त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले आणि पुढील हंगामासाठी त्याला कायम ठेवले आहे. याबाबत शशांक म्हणाला, “मी फ्रँचायझीचा आभारी आहे कारण त्यांनी मला आणखी एक संधी दिली आणि माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी मला दिलेल्या संधीबद्दल मी सदैव ऋणी राहीन. आता माझे काम त्यांना योग्य सिद्ध करणे आहे.”
चुकून संघाचा भाग बनला होता शशांक
पंजाब किंग्जने शशांकला आयपीएल 2024 साठी 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. यानंतर असा दावा करण्यात आला की संघाने त्याला चुकून विकत घेतले, कारण लिलावाच्या यादीत त्याच नावाचा आणखी एक खेळाडू होता. मात्र, शशांकने या गोष्टी बाजूला ठेवून गेल्या हंगामात धमाकेदार प्रदर्शन केले आणि संघ व्यवस्थापनाची मनेही जिंकली होती.
विजेतेपद पटकावण्याचा विश्वास व्यक्त केला
शशांक पुढे म्हणाला, “एक प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला तुमचे 100 टक्के देणे आवश्यक आहे, तरच तुमच्या संघात असण्याला अर्थ आहे. पंजाब किंग्ज आणि चाहत्यांनी माझ्यावर ज्या प्रकारे विश्वास दाखवला आहे, त्यामुळे माझी कामगिरी दुप्पट करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे जेणेकरून आम्ही विजेतेपदाच्या शर्यतीत राहू शकू.”
हेही वाचा –
रिटेंशनमध्ये कोहलीच्या आवडत्या सिराजवर का भारी पडला यश दयाल? जाणून घ्या आतली कहाणी
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!