---Advertisement---

विश्वचषकात किंग कोहली तिसऱ्या नाही तर या क्रमांकावर येणार फलंदाजीला

On: बुधवार, फेब्रुवारी 6, 2019 7:34 PM
---Advertisement---

आयसीसी वन-डे विश्वचषक 30मे, 2019 पासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापन सध्या विचारात आहे.

या स्पर्धेत विराट कदाचित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास येऊ शकतो, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी क्रिकबजला मुलाखत देताना म्हणाले आहेत.

यावेळी शास्त्री यांनी सलामीवीर कायम असणार असल्याच मत व्यक्त केलं आहे. स्थितीनुसार फलंदाजीच्या तिसऱ्या क्रमांकामध्ये बदल होऊ शकतो. फलंदाजीत समतोल राहण्यासाठी विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवावे लागेल. तर अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो, असेही शास्त्री म्हणाले.

गोलंदाजांसाठी पूरक खेळपट्टी असेल तर विश्वचषकासारख्या स्पर्धेत मी माझे फलंदाज का लवकर गमावू, असेही शास्त्री पुढे म्हणाले आहेत.

‘रोहित शर्माने सलामीला येत द्विशतके तर शिखर धवनने 5000 धावांचा टप्पा गाठला आहे’,असे म्हणत त्यांनी या सलामी जोडीचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयसीसी क्रमवारीत टाॅप १२ गोलंदाजांत फक्त तो एकटाच वेगवान गोलंदाज

रणजी ट्रॉफी २०१८-१९: विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रोमहर्षक स्थितीत

जेव्हा जेव्हा धोनी जबरदस्त खेळतो तेव्हा तेव्हा भारत तो सामना हरतो…

जर आजच्या सामन्यात युवराज असता तर टीम इंडिया पराभूत झाली नसती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment