वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर 80 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1ने मागे आहे.
या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या. यासाठी त्याने 31 चेेंडूचा सामना करत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1500 धावांचा टप्पा गाठला. त्याचबरोबर त्याने आज नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
तो विक्रम म्हणजे जेव्हा जेव्हा धोनी टी20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करतो तेव्हा भारत त्या सामन्यात पराभूत होतो. असे त्याच्याबाबतीत आतापर्यंत पाच वेळा घडले आहे.
2012मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक नाबाद 48 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 31 धावांनी गमावला होता. तर याचवर्षी इंग्लंड विरुद्धही त्याने 38 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारत 6 पराभूत झाला होता.
2016ला भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध धोनीने 30 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने 127 धावांचा पाठलाग करताना 79 धावांवरच 10 विकेट्स गमावल्या होत्या. यामुळे भारत या सामन्यात 47 धावांनी पराभूत झाला होता.
त्याचबरोबर 2017मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना धोनीने 36 धावा केल्या होत्या. या पण सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–जर आजच्या सामन्यात युवराज असता तर टीम इंडिया पराभूत झाली नसती
–आजचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी, कधीही विचार नाही केला तो विक्रम नावावर
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती






