आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) टी20 गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान अव्वल क्रमांकावर आहे. 2018मध्ये त्याने 8 सामन्यात 22 विकेट्स घेत उत्तम कामगिरी केली होती.
आश्चर्याची बाब म्हणजे, या यादीत पहिल्या 12 पैकी 11 गोलंदाज हे फिरकीपटू आहेत. या यादीत फहिम अश्रफ हा एकमेव मध्यमगती गोलंदाज आहे. यावरून असे दिसून येते 2018मध्ये फिरकीपटूंनी वेगवान गोलंदाजांपेक्षा चमकदार कामगिरी केली आहे. तसेच टी२०मध्ये संघाच्या विजयात फिरकीपटू महत्त्वाची भुमिका पार पाडत आहेत.
यामध्ये भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहल 11व्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तानचा शादाब खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1 जानेवारी 2018 पासून ते आत्तापर्यंत भारतीय फिरकीपटू गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा स्ट्राईक रेट 16 आहे. तर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचा 13 स्ट्राईक रेट आहे.
यामुळे भारताला फिरकीपटू गोलंदाज 16व्या चेंडूला तर वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत 19व्या चेंडूला एक विकेट मिळते. वेगवान गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिका सरस आहे.
कुलदीपने 17 टी20 सामन्यात 12.96च्या सरासरीने 33 आणि चहलने 28 सामन्यात 19.11च्या सरासरीने 45 विकेट्स घेतल्या आहेत.
नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यात कुलदीप-चहल जोडीने भारताकडून 100 वन-डे विकेट्सचा टप्पा पार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
–रणजी ट्रॉफी २०१८-१९: विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रोमहर्षक स्थितीत
–जेव्हा जेव्हा धोनी जबरदस्त खेळतो तेव्हा तेव्हा भारत तो सामना हरतो…
–जर आजच्या सामन्यात युवराज असता तर टीम इंडिया पराभूत झाली नसती






