आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या राहुल चाहरने युझवेंद्र चहलला मागे सोडत टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा बनवली होती. टी२० विश्वचषकापूर्वी चहलचा फॉर्म खालावला होता. त्याने त्याच्या प्रदर्शनात सुधारणा करेपर्यंत त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक २०२२साठी चहलने आपला दावा ठोकला आहे. अशात तो येत्या टी२० विश्वचषकात चाहरची जागा घेऊ शकतो. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याने या प्रकरणी आपले मत मांडले आहे.
चहलने (Yuzvendra Chahal) राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) प्रतिनिधित्त्व करताना आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळताना सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या एका डावातील ५ विकेट्सच्या कामगिरीचाही समावेश आहे. त्याने विकेट्सची हॅट्रिक घेत त्या सामन्यात ५ फलंदाजांना बाद केले होते. दुसरीकडे पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाकडून खेळताना चाहर (Rahul Chahar) ११ सामन्यांमध्ये केवळ १२ विकेट्स घेऊ शकला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमधील प्रदर्शन पाहाता तसेच गोलंदाजीत बऱ्याच सुधारणा केलेल्या चहलची प्रशंसा करताना पोलॉकने (Shaun Pollock) त्याला टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) आपला आवडता गोलंदाज म्हटले आहे.
पोलॉक म्हणाला की, “यामध्ये कसलीही शंका नाही की, चहलला त्याचा फॉर्म परत मिळाला आहे. तो वास्तवात पुन्हा चांगली गोलंदाजी करत आहे. गोलंदाजीवेळी त्याच्या पावलांमध्ये हलकीसी उसळी दिसू शकते. तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहे. मला वाटते की, आता तो टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी प्रबळ दावेदार असेल.”
पुढे बोलताना पोलॉक म्हणाला की, “मला त्याला पुन्हा भारतीय संघाकडून खेळताना पाहायला आवडेल. त्याचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे. मुंबईमध्ये मी त्याच्यासोबत काही चांगला वेळ घालवला आहे. तो खूप मजेशीर स्वभावाचा व्यक्ती आहे. जेव्हा मैदानावर काही गोष्टी घडत असतील, तेव्हा त्याला संघात ठेवणे खूप चांगले ठरते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा