ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट भारताच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. शॉन टेट यांची रणजी करंडक २०२१-२०२२ साठी पाँडेचेरी क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शॉन टेट यांच्यासाठी प्रथम प्राधान्य अफगाणिस्तान क्रिकेट संघ असेल. तर त्यांच्या उपलब्धतेनुसार ते रणजी ट्रॉफीमध्ये पाँडेचेरी संघात सामील होतील. पाँडेचेरी संघाचे मुख्य प्रशिक्षक दिशांत याज्ञिक आहेत आणि दोघेही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी संबंधित राहिले आहेत. शॉन टेट सप्टेंबरच्या अखेरीस भारतात येऊ शकतात आणि पाँडेचेरी संघात सामील होऊ शकतात.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर ते संघात सामील होऊ शकले नाहीत. दरम्यान अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. पाकिस्तानविरुद्धची मालिकाही एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अशा स्थितीत शॉन टेट यांचे अफगाणिस्तान संघात सामील होणे कठीण दिसत आहे. म्हणून हे शक्य आहे की, ते पाँडेचेरी संघासाठी अधिक वेळ देऊ शकतील.
दुसरीकडे रणजी रणजी करंडक स्पर्धेचा नवीन हंगाम जाहीर झाला आहे. त्यामुळे इतर संघाप्रमाणे पाँडेचेरीनेही आपली तयारी सुरू केली आहे. शॉन टेट यांची निवड देखील या तयारीचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
🏏 Announcement – CAP's Coaches & Support Staff for Sr. Men 2021-22#CricketAssociationOfPondicherry #Pondicherry pic.twitter.com/qF1TJy5RKT
— Cricket Association of Pondicherry (@CApondicherry) September 4, 2021
पुढील वर्षी १३ जानेवारी २०२२ पासून रणजी स्पर्धा, भारताच्या सहा शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाईल. प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्याआधी पाच दिवसांच्या विलगिकरणात राहणे अनिवार्य असेल. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान खेळली जाणार होती.
कोरोनानंतर प्रथमच रणजी करंडक स्पर्धेसाठी संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे. या अंतर्गत सहा गट तयार करण्यात आले आहेत. पाच गटांमध्ये एलिट संघ असतील, तर एक गट प्लेट टीम म्हणजेच नवीन आणि कमकुवत संघ यांच्यासाठी बनवण्यात आला आहे. एलिट टीम गटात सहा संघ असतील तर प्लेट गटात आठ संघ असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
शेरास सव्वाशेर! पंतने केलेल्या चेष्टेला शमीकडून तोडीस तोड उत्तर, जाडेपणाची करुन दिली आठवण
“भारतीय संघाकडून खेळण्याच्या लायक नाही रहाणे, आता त्याने युवकांसाठी जागा रिकामी करावी”
रोहितच्या ‘हिट शो’ पुढे अँडरसन बेजार, चौकार गेल्यानंतर असा व्यक्त केला राग; तुम्हीही पाहा