पुरुषांच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय महिला संघाने शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये खेळला होता. त्यामुळे हा त्यांच्यासाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे.
या कसोटीत भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज शेफाली वर्माने टी20 नंतर कसोटीत देखील आपलं नाणं खणखणीत वाजवले आहे. इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टेलमध्ये होण्याऱ्या एकमात्र कसोटीत पदार्पण करीत या 17 वर्षीय खेळाडूने 96 धावांची पहिल्या डावात विस्फोटक खेळी केली. तिचे शतक जरी 4 धावांनी हुकले असले तरी तिने आपल्या नावावर अनेक विक्रम केले.याच शेफालीसंबंधी एक मोठा उलगडा झाला आहे.
वडिलांकडून भेटायचं बक्षीस-
शेफालीने आपल्या खेळीत 152 चेंडूंवर 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. मोठे मोठे शॉट्स खेळणाच्या आपल्या कलेबद्दल या आक्रमक फलंदाजाने पत्रकार परिषदेत सांगितले की, तिचे वडील मोठे मोठे शॉट्स खेळल्यावर तिला आणि तिच्या भावाला 10-15 रुपये बक्षीस देत असत. त्यामुळे लहानपणी तिने षटकार मारण्याचा खूप सराव केला. शेफाली आणि स्मृती मंधानाने पहिल्या बळीसाठी 167 धावांची भागीदारी केली. ही कसोटी क्रिकेटमधील भारताकडून पाहिल्या बळीसाठी केलेली सगळ्यात मोठी भागीदारी ठरली आहे.
शेफाली कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला खेळाडू झालेली आहे. तिने चंद्रकांता कौलच्या विक्रमाला गवसणी घातली आहे, ज्यांनी आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 75 धावा केल्या होत्या. 96 धावांवर असताना शेफाली केट क्रॉसच्या गोलंदाजीवर बाद झाली.
आपल्या विस्फोटक खेळीबद्दल शेफालीने सांगितले की, “मी तिच्या वयाचा विचार करीत नाही. मी आत्मविश्वासाने मैदानावर उतरते आणि माझे लक्ष संघासाठी कशाप्रकारे योगदान देता येईल याकडे असते. माझ्या फटकेबाजीबद्दल सांगायचे झाले तर, माझे वडिल बालपणी मला आणि माझ्या भावाला एका फटक्याचे बक्षीस द्यायचे. आम्हाला 10-15 रुपये मिळत असतं. त्यामुळे मी बालपणी पळून धावा करण्यापेक्षा जास्त चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याचा सराव केला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत