---Advertisement---

मुंबई इंडियन्सची जर्सी आणि मास्क घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला गेला हा खेळाडू; संघ झाला ट्रोल

---Advertisement---

मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामाचे विजेतेपद मिळवले. या अंतिम सामन्याबरोबरच आयपीएलचा हा हंगामही संपला. त्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहेत, तर काही भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. तसेच काही खेळाडू युएईतून थेट पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी गेले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग खेळायला गेलेल्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू शेर्फन रदरफोर्डदेखील आहे. पण यावेळी जेव्हा पाकिस्तानला पोहचला तेव्हा तो मुंबई इंडियन्सच्याच जर्सीमध्ये दिसला. तो कराची किंग्सकडून पीएसएल खेळणार आहे. त्यामुळे तो विमानतळावर पोहचलेला फोटो कराची किंग्सने ट्विटरला पोस्ट केला होता.

यावर अनेक चाहत्यांनी त्याने मुंबई इंडियन्सचे जॅकेट आणि मास्क घातलेला लक्षात आणून दिले. त्यामुळे कराची किंग्स संघ बराच ट्रोल झाला.

 

रदरफोर्ड यंदा मुंबई इंडियन्सचा भाग असला तरी त्याला आयपीएल २०२० च्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला मुंबईने मागीलवर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेडिंगमध्ये घेतले होते.

१४ नोव्हेंबरपासून सुरु होणार पीएसएलचे प्लेऑफ सामने –

खरंतर पीएसएल २०२० चा हंगाम मार्चमध्येच संपणार होता. परंतु, स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली. त्यानंतर आता १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान उर्वरित प्लेऑफचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून युवराज सिंगला ‘त्या’दिवशी करायची नव्हती अंघोळ

“धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल”, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---