---Advertisement---

Valentines Day Special : लव्ह अॅट फर्स्ट साईट! शिखर धवनची फिल्मी प्रेमकहाणी

On: रविवार, फेब्रुवारी 14, 2021 4:00 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन नेहमीच त्याच्या रांगडेपणासाठी ओळखला जातो. त्याचे टोपननावही ‘गब्बर’ आहे, यावरुन त्याच्या रांगडेपणाची ओळख पटू शकते.  त्याच्या नावाप्रमाणेच त्याचा खेळण्याचा अंदाजही आक्रमक आहे. अशा या भारतीय क्रिकेटपटूची प्रेमकहाणीही अनोखीच आहे.

आज आपण शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊ. शिखरने त्याची त्याच्या पत्नीबरोबर पहिली ओळख कशी झाली याचा खुलासा ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात केला होता. भारताच्या या रांगड्या खेळाडूची बायकोशी ओळख ही फेसबुकच्या माध्यमातून झाली असल्याचे त्याने सांगितले.

बंगाली सुंदरी असणाऱ्या आयेशा मुखर्जीला शिखरने प्रथम फेसबुक या सोशल मेडिया वेबसाईटवर पाहिले होते. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याला हे नाव सुचवल्याचं शिखर म्हणतो. जेव्हा तिला पहिल्यांदा फेसबुकवर पाहिलं तेव्हाच ती शिखरला आवडल्याचं तो सांगतो.

त्यानंतर त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही काळाने तिने ती स्वीकारली आणि या सुंदर जोडप्यात फेसबुकच्या माध्यमातून संवाद सुरु झाला.

https://www.instagram.com/p/B4O9LAfndD_/

आयेशाचे वडील हे भारतीय तर आई इंग्लिश आहे. तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी लगेचच तिच कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालं. तिने नंतर किकबॉक्सिंगच प्रशिक्षण घेतलं. ती चांगलं बंगाली आणि इंग्लिश बोलते.

शिखर आणि आयेशाने त्यांच्या जवळपास 4 वर्षांच्या प्रेमाचे रुपांतर 30 ऑक्टोबर 2012 मध्ये पती-पत्नीच्या नात्यात केले. त्यांच्या विवाहसोहळ्यास कुटुंबियांशिवाय काही भारतीय क्रिकेटपटूही सामील झाले होते.

https://www.instagram.com/p/CDYXw14jX9A/

विशेष म्हणजे आयेशा शिखर पेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तसेच आयेशाचे शिखर आधी एका ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी लग्न झालं होतं. परंतु, काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली असून एकिच नाव रिहा तर दुसरीच आलिया आहे. लग्नानंतर या दोन्ही मुलींना शिखर आपल्याच मुली मानतो. तसेच आयेशा आणि शिखरला 2014 मध्ये झोरावर नावाचा मुलगा झाला.

https://www.instagram.com/p/BtJKkzmhSt7/

सध्या शिखर भारतात राहतो तर आयेशा ऑस्ट्रेलियामध्ये रिहा, आलिया आणि झोरावरसह राहते. शिखर अधूनमधून ऑस्ट्रेलियात जात असतो. तर कधी आयेशा भारतात येते.

महत्वाच्या बातम्या:

श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती

बांगलादेश वि वेस्ट इंडीज : दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे पारडे जड, कॉर्नवॉलचे बळींचे पंचक

आयएसएल २०२०-२१ : सुपर सब इशानमुळे गोव्याने चेन्नईयीनला रोखले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---