भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. मात्र श्रीलंका संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती, ज्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना १८ जुलै रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. परंतु पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून डावाची सुरुवात कोण करणार? याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. चला तर पाहूया, कोण आहेत सलामी फलंदाजीसाठी पर्याय?
भारतीय संघात सलामी फलंदाजीसाठी शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड पर्याय आहेत. परंतु माध्यमातील वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळण्याची वाट पहावी लागु शकते. कारण संघ व्यवस्थापक शिखर धवनसोबत पृथ्वी शॉला संधी देऊ शकतात.(Shikhar Dhawan and Prithvi shaw to start Indian inning in first odi)
आयपीएलमुळे शिखर – पृथ्वी शॉच्या जोडीला मिळणार प्राधान्य
भारतीय संघाकडे देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड हे दोन उत्तम पर्याय आहेत. यासह नितीश राणा देखील आहे, जो सलामी फलंदाजी करू शकतो. परंतु या मालिकेत पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या जोडीला जास्त प्राधान्य दिले जाईल. यामागील मुख्य कारण म्हणजे, दोघेही आयपीएल स्पर्धेत एकत्र डावाची सुरुवात करतात. तसेच दोघांनी मिळून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबरोबरच पृथ्वी शॉने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत ८०० पेक्षा जास्त धावा करत स्वत:ची दावेदारी सिद्ध केली आहे.
तसेच बीसीसीआयच्या एका सूत्राने म्हटले आहे की, “पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात चांगला ताळमेळ आहे, कारण दोघेही आयपीएल स्पर्धेत एकाच संघातून खेळतात. माझ्या मते, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळण्याची वाट पाहावी लागेल.”
असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटचा वारसा लाभलेल्या ‘या’ बड्या क्रिकेटरने नवव्या क्रमांकावर झळकावलीत २ शतके
‘कुलचा’ जोडी आउट ऑफ फॉर्म, त्यांच्याऐवजी ‘हा’ गोलंदाज चांगला खेळेल; माजी क्रिकेटरचे मत
आयसोलेशनमधील भारतीय खेळाडूंबाबत महत्त्वाची अपडेट, कोरोना टेस्टचा अहवाल आला पुढे