सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शनिवार (१७ ऑक्टोबर) रोजी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ३४व्या सामन्यात ३ जीवनदानांचा फायदा घेत आयपीएलमधील आपले पहिले शतक जडले. शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला आणि आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने एकहाती विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यादरम्यान चेन्नईच्या रवींद्र जडेजाने आपल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली.
झाले असे की, चेन्नईने दिलेल्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धवन नेहमीप्रमाणे सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. अशात जडेजा सामन्यातील ७वे षटक टाकण्यासाठी आला. जडेजाच्या त्या षटकात धवनने एकापाठोपाठ एक सलग २ चौकार लगावले. त्यानंतर जडेजाने मस्तीमध्ये जाऊन धवनची गळाभेट घेतली.
इंडियन प्रीमियर लीगने ट्विटरवर जडेजा आणि धवनचा गळाभेट घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, ‘इथे स्पर्धा तर आहेच, सोबतच बंधुताही आहे.’
https://twitter.com/ChennaiIPL/status/1317691309960941568?s=20
https://twitter.com/IPL/status/1317506331780132864?s=20
चेन्नई संघानेही त्यांचा दोघांचे फोटो शेअर करत ट्विट केले आहे. त्यामुळे जडेजाच्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय रे भाऊ! हैदराबाद-कोलकाता सामन्यातील पंच पुरुष की महिला?, घ्या जाणून
व्हिडिओ: जडेजाने फटकावलेला शानदार षटकार थेट मैदानाबाहेर, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने पळवला चेंडू
‘…म्हणून मी १९ व्या षटकात उनाडकटला गोलंदाजी दिली’, स्टिव्ह स्मिथने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…





