आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या 33 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांना बेंगलोरच्या फलंदाजांना योग्य वेळी बाद करण्यात अपयश आले. त्यामुळेच विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले. जर आम्ही विकेट्स घेतल्या असत्या तर कदाचित सामना जिंकला असता, असे राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने सांगितले.
डिविलिअर्सच्या खेळीनेच गमावला सामना
स्मिथ म्हणाला की, “आमची कामगिरी निराशाजनक होती, मागील दोन्ही सामन्यात आम्हाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आम्हाला विजय अपेक्षित होता. आम्ही संथ खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारली होती. आमचे गोलंदाज योग्य वेळी बळी घेण्यात अपयशी ठरले. आम्ही काही निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी सुद्धा झालो. मैदान मोठे असल्यामुळे वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला 19 व्या षटकात गोलंदाजी दिली.”
”धडाकेबाज फलंदाज एबी डिविलिअर्सवर याचा काहीच प्रभाव पडला नाही. त्याच्या उत्कृष्ट खेळीनेच आम्ही सामना गमावला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला 19 व्या षटकांत गोलंदाजी देण्याचा विचार केला होता, पण मी इतर पर्याय निवडला,” असेही तो पुढे म्हणाला.
19 वा षटक ठरला टर्निंग पॉईंट
जेव्हा आरसीबीला 2 षटकांत 35 धावांची आवश्यकता होती, तेव्हा कर्णधार स्मिथने स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला गोलंदाजी न देता जयदेव उनाडकट याला गोलंदाजी दिली. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे राजस्थानचा पराभव झाला . एबी डिविलियर्सने उनाडकटच्या 3 चेंडूवर सलग 3 षटकार लगावले आणि त्या षटकात आरसीबीला 25 धावा काढण्यात यश आले आणि सामना राजस्थानच्या हातून निघून गेला.
राजस्थानने फलंदाजीत बजावली चांगली कामगिरी
राजस्थानने फलंदाजीत चांगली कामगिरी बजावली परंतु गोलंदाजीत निराशा केली. राजस्थानने दुबईच्या मोठ्या मैदानावर शेवटपर्यंत पकड बनवून ठेवली होती. एबी डिविलिअर्सने 22 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकत राजस्थानच्या जबड्यातून विजय खेचून आणला. त्याने राजस्थानला सामन्यात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही. डिविलिअर्सने त्याच्या खेळीत 1 चौकार आणि 6 षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने स्टिव्ह स्मिथला दिला ‘हा’ इशारा
सामन्याआधी विराटपासून ‘ती’ गोष्ट लपवली, डिविलिअर्सने केला खुलासा
‘मिस्टर ३६०’ ठरला आरसीबीचा संकटमोचक, ७ विकेट्सने राजस्थानला लोळवलं
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष