भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ धावांनी आणि दुसरा सामना २ विकेट्सने जिंकत भारतीय संघाने २-० च्या फरकाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर आता उभय संघातील तिसरा सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन याच्याकडे मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर आणि विस्फोटक फलंदाज धवनने तिसऱ्या सामन्यात २ चौकार मारल्यास तो मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.
धवन करू शकतो हा विश्वविक्रम
धवनला त्याच्या आक्रमक खेळींसाठी ओळखले जाते. पहिल्या वनडे सामन्यात त्याने ९७ धावांची धुव्वादार खेळी खेळली होती. या सामन्यात केवळ ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते. तर दुसऱ्या सामन्यात तो १३ धावा करून बाद झाला होता. या सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही बाउंडी निघाली नव्हती. अशात जर धवनने आता तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात पुन्हा चौफेर फटकेबाजी केली, तर विश्वविक्रमाला गवसणी घालेल.
धवनने जर या सामन्यात २ चौकार मारले, तर तो वनडे क्रिकेटमधील त्याचे ८०० चौकार पूर्ण करेल. असे करणारा तो नववाच भारतीय क्रिकेटपटू असेल. आतापर्यंत धवनने १५४ वनडे सामने खेळताना १५१ डावांमध्ये फलंदाजी करत ७९८ चौकार मारले आहेत.
दिग्गजांच्या यादीत होईल सहभागी
धवनपूर्वी ८ भारतीय दिग्गज असे राहिले आहेत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये ८०० चौकार मारले आहेत. यामध्ये क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचाही समावेश होतो. सचिन वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत अव्वलस्थानी असून त्याने २०१६ चौकार मारले आहेत. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ११५९ षटकारांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एकूण आकडे पाहायचे झाल्यास, सचिननंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १५०० चौकार मारले आहेत. त्यानंतर श्रीलंकन दिग्गज कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३८५ चौकार मारले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त तीन टी-२० सामन्यांमध्ये संधी दिल्यानंतर उमरान मलिकचा पत्ता कट, आता ‘असा’ आहे पुढचा प्लॅन
कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारताचा संघ बर्मिंघममध्ये दाखल, पाहा संपूर्ण स्केड्यूल एका क्लिकवर
मराठी समालोचनासाठी मनसेचा पुन्हा खळखट्याकचा इशारा!