पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३८वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना पंजाबचा सलामीवीर शिखर धवन याच्यासाठी सर्वार्थाने खास ठरला. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. या खास सामन्यात त्याने काही खास विक्रमही आपल्या खात्यात जमा केले आहेत.
शिखर धवनचे सामन्यांचे द्विशतक
चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी (CSK vs PBKS) मैदानावर पाऊल ठेवताच धवन (Shikhar Dhawan) आयपीएलमध्ये २०० सामने (200 IPL Matches) खेळणारा आठवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनीही हा पराक्रम केला आहे. धोनी सर्वाधिक आयपीएल सामन्यांसह या यादीत अव्वलस्थानी आहे. पंजाबविरुद्धचा सामना धोनीचा २२८ वा सामना होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू:
२२८ – एमएस धोनी
२२१- दिनेश कार्तिक
२२१- रोहित शर्मा
२१५- विराट कोहली
२०८ – रवींद्र जडेजा
२०५- सुरेश रैना
२०१ – रॉबिन उथप्पा
२००* – शिखर धवन
Congratulations to @SDhawan25 who is all set to play his 200th IPL game today.
Go well, Gabbar 😎😎#TATAIPL #PBKSvCSK pic.twitter.com/mFI88AfJzj
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
सर्वाधिक धावांच्या विक्रमात धवन पोहोचला विराटच्या नजीक
तसेच धवनने चेन्नईविरुद्ध सलामीला फलंदाजीला येत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ६००० धावांचा (6000 IPL Runs) टप्पा गाठला आहे. दुसरी धाव घेताच त्याने या अद्वितीय कामगिरीला आपल्या नावे केले. यासह तो विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ६४०२ धावा केल्या आहेत.
Milestone 🚨 – 6000 IPL runs and counting for @SDhawan25 👏👏
He is only the second player to achieve this feat in IPL.#TATAIPL #PBKSvCSK pic.twitter.com/G4Eq1t88Dx
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
विराट, रोहितनंतर ठरला तिसराच भारतीय
इतकेच नव्हे तर, धवन विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा (9000 T20 Runs) आकडा गाठणारा केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याला हा विक्रम करण्यासाठी केवळ ११ धावांची गरज होती. चेन्नईविरुद्ध त्याने ११ धावा फटकावत या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Dha-won our ❤️s once again 🥺@SDhawan25 has another notch in his belt as he completes 9️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20 runs 😍#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #PBKSvCSK #ਸਾਡਾਪੰਜਾਬ pic.twitter.com/tqNhCvIzzF
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 25, 2022
विराटच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १०३९२ धावा आहेत, ज्या कोणत्या भारतीय फलंदाजाने बनवलेल्या सर्वाधिक धावा आहेत. विराटनंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या खात्यात १००४८ धावांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हुश्श वाचले! केएल राहुलच्या तेज तर्रार शॉटने फोडलं असतं मुंबईच्या गोलंदाज अन् पंचाचं डोकं- Video
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार
सीएसकेचा परदेशी शिलेदार चढला बोहल्यावर, प्रेयसीशी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल