---Advertisement---

‘भारतीय कर्णधाराला मिळणार नाही टी२० विश्वचषकात संधी,’ माजी क्रिकेटपटूचे परखड भाष्य

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 4:44 PM
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ टी -२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये असल्यामुळे भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी, माजी भारतीय क्रिकेटपटूने शिखर धवनबद्दल भाष्य केले आहे.

भारतीय संघासाठी १० कसोटी सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शिखर धवनबद्दल भाष्य करताना  म्हटले की, “मला नाही वाटत की, भारतीय संघ शिखर धवनवर लक्ष केंद्रित करत आहे. कारण जेव्हा शिखर धवनने इंग्लंड संघाविरुद्ध शेवटची टी -२० मालिका खेळली होती तेव्हा त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. तर उर्वरित चार सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. हे योग्य नव्हते.”

असे झाले तर शिखर धवनचे स्थान होऊ शकते निश्चित?
तसेच तो पुढे म्हणाला की,”शिखर धवनने आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती, त्यामुळे तुम्ही त्याला संघात स्थान देऊ शकतात. परंतु असेही होऊ शकते की,पहिल्यांदा तुम्ही त्याला संघाबाहेर बसवणार आणि नंतर पुन्हा त्याला संघात स्थान द्याल. त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यावर तो चांगली कामगिरी करण्यास यशस्वी ठरला तर तो संघात आपले स्थान निश्चित करू शकतो.”( shikhar dhawan might be overlooked for t20 worldcup squad says akaksh chopra )

शिखर धवनची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी 

शिखर धवनने आतापर्यंत एकूण ६५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २७.९० च्या सरासरीने १६७३ धावा केल्या आहेत. यादरम्यान  त्याने ११ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच ९२ धावा हि त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

महत्वाच्या बातम्या- 

भारताच्या ‘द्वितीय श्रेणी’च्या संघाने श्रीलंकेला येणे आमचा अपमान; माजी कर्णधाराच्या विधानामुळे नवा वाद

काय सांगता! युझवेंद्र चहलच्या पत्नीच्या हातावर गोंदलेले आहे तिच्या ‘एक्स बॉयफ्रेंड’चे नाव

दिनेश कार्तिकच्या समालोचनाची सर्वत्र रंगली चर्चा; म्हणाला ‘बॅट ही शेजाराच्या बायकोसारखी असते’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---