मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा सामना सोमवारी (२५ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार असून या सामन्यादरम्यान पंजाब किंग्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला आयपीएलमधील मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
शिखर धवनला मोठ्या विक्रमाची संधी
शिखर धवनने (Shikhar Dhawan) जर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) २ धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये ६००० धावांचा (6000 IPL Runs) टप्पा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा तो दुसरा खेळाडू बनेल. यापूर्वी असा कारनामा केवळ विराट कोहलीने केला आहे. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २१५ सामन्यांत ३६.५८ च्या सरासरीने ६४०२ धावा केल्या आहेत.
तसेच सध्या शिखरने आयपीएलमध्ये २०१ सामन्यांत ३४.६७ च्या सरासरीने ५९९८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने २२१ सामन्यांत ५७६४ आयपीएल धावा केल्या आहेत (Most IPL Runs).
महत्त्वाचे म्हणजे शिखर धवन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाराही फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ६७५ चौकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ ५५५ चौकारांसह विराट कोहली आहे. तसेच ५३४ चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे.
पंजाबकडून यंदा खेळतोय शिखर
आयपीएल २०२२ (IPL 2022) आधी शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सने मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात उतरला होता. त्याला पंजाब किंग्सने लिलावात ८.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघाशी जोडू घेतले. शिखरने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये ७ सामन्यांमध्ये ३०.५७ च्या सरासरीने २१४ धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात १ अर्धशतक केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध मॅच जिंकली, शतक केलं, तरी केएल राहुलला २४ लाखांचा दंड; वाचा नक्की काय केली चूक
इशानचं नशीबच फुटकं! बिश्नोईच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने झाला बाद, पाहणारा प्रत्येकजण हैराण