---Advertisement---

शाम मस्तानी, मदहोश… टीम इंडियाच्या ‘कान्हा’चे बासरीवादन तुम्हालाही करेल मंत्रमुग्ध; एकदा ऐकाच

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 9:46 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन हा सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. ‘गब्बर’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्यच वाटले. शिखर धवनचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिखर धवनने पोस्ट केलेला हा व्हिडिओ तो मैदानावर सराव करत असतानाचा किंवा तो फलंदाजी करत असतानाचा नाही. तर या व्हिडिओमध्ये तो बासरी वाजवताना दिसून आला आहे. शिखरने किशोर कुमार याचे गाणे ‘ये शाम मस्तानी’ या गाण्यावर बासरी वाजवली आहे. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ गाणे म्हणत असून शिखर बासरी वाजवताना दिसून येत आहे.

भारतीय संघाच्या सलामी जोडीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत शिखरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गुरुवारचे संगीत, आमचे घरातले सुपरस्टार गायक पृथ्वी शॉ.’

https://www.instagram.com/reel/CRV46RtCnh9/?utm_source=ig_web_button_share_sheet

शिखर धवन 37 वर्षाचा विक्रम तोडू शकतो 
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी जेव्हा शिखर मैदानात उतरेल; तेव्हा तो भारतीय संघाचे नेतृत्व करणारा देशाचा सर्वात वयस्कर कर्णधार होईल. कारण शिखर त्यावेळी 35 वर्ष 225 दिवसांचा असणार आहे. या अगोदर मोहिंदर अमरनाथ यांनी वय वर्ष 34 असताना कर्णधारपद सांभाळले होते. शिखर त्यांच्या हा 37 वर्षे जुना विक्रम मोडेल. भारताचा श्रीलंका दौरा 18 जुलैपासून एकदिवसीय सामन्यासह सुरू होईल. या मालिकेतील सर्व सामने कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

युवा क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष
श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाला एकूण तीन एकदिवसीय सामने आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हे सामने खेळणार आहे. तर भुवनेश्वर कुमार याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असतील.

आगामी टी20 विश्वचषकच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे. या दौर्‍यावर गेलेल्या संघामध्ये बरेचसे युवा खेळाडू आहेत, ज्यामध्ये के गौतम, देवदत्त पादक्कल, नितीश राणा, ऋतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया यांचा समावेश आहे. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि पृथ्वी शॉ या दोन्ही फलंदाजांवर सर्वांचे लक्ष असेल. ईशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन यष्टिरक्षकही या संघात आहेत. तसेच अनुभवी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा देखील संघात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिपक हुड्डाच्या निर्णयाने उडाली खळबळ, कृणाल पंड्यानं केलेल्या अपमानानंतर सोडला संघ

आजवर श्रीलंकेत फक्त ‘या’ ३ भारतीय कर्णधारांनी ठोकलंय शतक, नवा कॅप्टन धवन करेल हा पराक्रम?

विराट ब्रिगेडवर कोरोनाचं संकट, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---