भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेला आजपासून (१८ जुलै) वनडे सामन्याने प्रारंभ होणार आहे. भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे या दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच संघाचे कर्णधारपद शिखर धवनला आणि उप कर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे देण्यात आले आहे. शिवाय या संघात ६ अनकॅप खेळाडू आहेत. अशातच सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत या संघात कोणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत नवनियुक्त कर्णधार शिखर धवनने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय कर्णधार शिखर धवनने म्हटले की, “प्रत्येक खेळाडू टी-२० विश्वचषक स्पर्धा मनात ठेवून ही मालिका खेळणार आहे. निश्चितच जर निवडकर्ते, रवी शास्त्री सर किंवा विराट कोहली यांच्या मनात एखादा खेळाडू असेल तर आम्ही त्याला नक्की संधी देऊ. कारण ही एक उत्तम संधी आहे. जर टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी तुम्हाला एखाद्या खेळाडूची परीक्षा घ्यायची असेल; तर ही शेवटची मालिका आहे.” धवनने या पत्रकार परिषदेत संघाची प्लेइंग इलेव्हन आणि सलामीवीर केव्हा घोषित करणार? याबाबत भाष्य केले आहे.
धवनने पुढे म्हटले की, “आम्ही सलामी जोडी कोण असेल आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली जाईल?, याची घोषणा रविवारी (१८ जुलै) करणार आहोत. तसेच असं काहीच नाहीये की, प्रत्येक खेळाडूला या मालिकेत संधी दिली जाईल.” (Shikhar Dhawan says if Ravi Shastri Virat Kohli have some players in their mind for t 20 world cup he will play)
तसेच तो पुढे म्हणाला की, “सूर्यकुमार यादव एक महान खेळाडू आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत स्वतःला सिद्ध केलं आहे. मला खात्री आहे की, तो या मालिकेत देखील चांगली कामगिरी करेल. कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे.”
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश
‘गब्बर’कडे सुवर्णसंधी! एक-दोन नव्हे, तर ‘हे’ ५ विक्रम करु शकतो धवन ; गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी