भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारपासून (18 जुलै) एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका बोर्डाने आंतरराष्ट्रीय समालोचन पॅनेल जाहीर केले गेले आहे. श्रीलंका बोर्डाने ट्वीटद्वारे ही माहिती सर्वांना शेअर केली आहे. या समालोचकांच्या पॅनेलमध्ये दोन भारतीय दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे.
चारू शर्मा आणि मुरली कार्तिक हे 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत समालोचन करताना दिसून येणार आहेत. तर श्रीलंका संघाकडून रोशन अबेसिंगे आणि रसेल अर्नोल्ड हे समालोचन करणार आहेत. याचबरोबर न्यूट्रल समालोचक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एच डी एकरमैन यांनाही सहभागी केले आहे.
तर दुसरीकडे भारतामध्ये सोनी स्पोर्ट्स भारत-श्रीलंका सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पॅनलमध्ये हिंदी समालोचक म्हणून अर्जुन पंडित, मोहम्मद कैफ, विवेक राजदान, अमित मिश्रा आणि सबा करीम यांनी सहभागी केले आहे.
श्रीलंकेचा नवा कर्णधार दासुन शनाकाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वी शनिवारी सांगितले की, संघर्ष करत असलेला त्यांचा संघ आणि विजयाचा दावेदार मानला जाणारा भारतीय संघ यांच्यात बरोबरीचा सामना होणार आहे. कारण भारतीय संघामध्ये काही नवीन खेळाडू आहेत. युवा खेळाडूंसोबत श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघामध्ये एकूण सहा नवीन खेळाडू आहेत, जे श्रीलंकेविरुद्ध आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळतील.
????️ International Commentary panel for the India Tour of Sri Lanka 2021⬇️#SLvIND pic.twitter.com/LTyGTIEy36
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 17, 2021
भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या अगोदर शनाका म्हणाला की, “दोन्ही संघ मालिकेपूर्वी तितकेच मजबूत आहेत. भारतीय संघात बरेच नवीन खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंनी आयपीएलचे सामने खेळले आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना समान संधी आहेत.”
भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया
श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप-कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसांका, चरिथ असलांका, वाईनिडू हसरंगा, एसेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडाना , रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, दुशमंत चमिरा, लक्ष संदकन, अकिला धनंजय, शिरण फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयर्थे, प्रवीण जयविकर्मा, असिता फर्नांडो, इसुरू उडाना आणि कसून राजीथा
महत्त्वाच्या बातम्या-
‘गब्बर’कडे सुवर्णसंधी! एक-दोन नव्हे, तर ‘हे’ ५ विक्रम करु शकतो धवन ; गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी
‘हा फिलंच वेगळा’, सरावाला सुरुवात करताना हिटमॅनने केली भावनिक पोस्ट






