---Advertisement---

भारीच ना! अवघ्या २ धावांनी हुकले शतक, पण सामन्यानंतर धवनने आपल्या शब्दांनी जिंकले चाहत्यांचे मन

On: बुधवार, मार्च 24, 2021 11:21 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात धवनला शतक पूर्ण करण्यापासून अवघ्या २ धावांनी वंचित राहावे लागले. त्याने ९८ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने संघाबाहेर असताना काय केले, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत धवनला पहिल्या टी-२० सामन्यात खेळायची संधी मिळाली. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. तसेच त्याने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात त्याने १०६ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने ९८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना भारतीय संघाच्या नावे राहिला. सामना जिंकल्यानंतर शिखरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “मी खूप मेहनत घेत होतो. जिम, धावणे आणि नेट सेशन सर्व काही व्यवस्थित सुरू होते. या सर्व गोष्टींचा मला फायदा झाला.”

तसेच संघाबाहेर असल्यासंबंधी विचारल्या गेलेल्या प्रश्नावर तो उत्तर देत म्हणाला, “जेव्हा मी खेळत नव्हतो, मी त्यावेळी हाच विचार करत होतो की, मी संघासाठी काय करू शकतो. मी एक चांगला १२ वा खेळाडू बनण्याचा प्रयत्न करत होतो. पाणी घेऊन जाऊन त्यांना पाणी पाजण्याचा विचार करत होतो. तसेच मी खूप पॉझिटिव्ह देखील होतो. तसेच एकाच गोष्टीचा विचार करत होतो की, जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी धावा करेल.”

शतक पूर्ण करण्यास अपयशी
सलामीला आलेल्या धवनने आक्रमक ९८ धावांची खेळी केली. अवघ्या २ धावांसाठी त्याचे शतक राहून गेले याबाबत तो म्हणाला, “थोडे दुःख होते. परंतु मी असा व्यक्ती आहे, जो जास्त आनंदी किंवा दुःखी होत नाही. मी शतक करण्याची घाई केली. फक्त १ शॉट मारला आणि बाद झालो. पुढे संधी मिळेल.”

पहिल्या टी-२० सामन्यातून झाला होता बाहेर
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात शिखर धवनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर त्याला पुढील सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील त्याने ३ वनडे सामन्यात १ अर्धशतक झळकावले होते आणि टी-२० मालिकेत देखील त्याला एक अर्धशतक झळकावण्यात यश आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते

-मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय

-भारतीय संघाबरोबरच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवस श्रेयस अय्यर राहू शकतो क्रिकेटपासून दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---