---Advertisement---

शिखर धवनचे गोलंदाजांवर वर्चस्व, झळकावले तुफानी शतक!

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2024 6:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज ‘शिखर धवन’ने (Shikhar Dhawan) भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले असेल, पण त्याची फलंदाजीची शैली अजूनही उत्कृष्ट असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. या वर्षी निवृत्त झालेल्या धवनने जबरदस्त खेळी केली, जिथे त्याने चौकार आणि षटकारांच्या जोरावर झंझावाती शतक ठोकले. दरम्यान त्याने दाखवून दिले की, तो अजूनही त्याच लयीत फलंदाजी करू शकतो.

बराच काळ भारतीय संघापासून दूर राहिल्यानंतर ‘शिखर धवन’ने (Shikhar Dhawan) यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्ती घेतली. यानंतर हा भारतीय फलंदाज इकडे-तिकडे अनेक टी20 लीगमध्ये भाग घेत आहे. सध्या खेळल्या जाणाऱ्या बिग क्रिकेट लीग 2024 मध्ये देखील धवन सामील आहे. तो नॉर्दर्न चॅलेंजर्सचा कर्णधार आहे. आजच्या (17 डिसेंबर) सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना त्याने केवळ 63 चेंडूत 119 धावा केल्या. दरम्यान त्याने 14 चौकारांसह 5 षटकार ठोकले.

या स्पर्धेतील 10वा सामना नॉर्दर्न चॅलेंजर्स आणि यूपी ब्रिज स्टार्स संघात सुरतमधील लालाभाई कॉन्ट्रॅक्टर मैदानावर खेळला जात आहे. गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेल्या धवनने या सामन्यात आपला सलामीवीर ‘समिउल्लाह शिनवारी’सोबत (Samiullah Shinwari) 207 धावांची भागीदारी केली. यादरम्यान धवनने 119 धावा केल्या, तर समिउल्लाह शिनवारीने 46 चेंडूत 111 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 11 षटकार ठोकले. या दोन्ही फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर नॉर्दर्न चॅलेंजर्सने 2 गडी गमावून 271 धावा केल्या आहेत.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबतच अनेक विदेशी खेळाडूही खेळत आहेत, ज्यात सुरेश रैना (Suresh Raina), इरफान पठाण (Irfan Pathan), इम्रान ताहिर (Imran Tahir) आणि तिलकरत्ने दिलशान (Tillakaratne Dilshan) या दिग्गजांचा समावेश आहे. (12 डिसेंबर) पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये धवनने शानदार कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमराह, आकाश दीपच्या जोडीने रचला इतिहास! 21व्या शतकाच प्रथमच असे घडले
VIDEO; कोहलीच्या बॅटने आकाश दीपनं ठोकला षटकार! अन् कोहली, रोहितसह गंभीरचा आनंद गगनात मावेना
“माझे स्वप्न विराट कोहलीला भेटायचे आहे” स्टार खेळाडूने व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---