बंगळुरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात ऍरॉन फिंचने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात शिखर दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या डाव्या खांद्याला मार लागला आहे.
त्याला मार लागल्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ मैदानात आले. त्यानंतर शिखर त्यांच्यासह मैदानाबाहेर गेला.
त्यामुळे लगेचच शिखरला एक्स-रे काढण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली जाईल असे बीसीसीआयने सांगितले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1218840581419368453
पण शिखर सामना सुरु असताना हाताला पट्टी बांधून बसलेला दिसून आला आहे. त्यामुळे त्याची या सामन्यात फलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे.






