भारतीय संघाला बुधवारी (२८ जुलै) श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका संघाने ४ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह श्रीलंका संघाने ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याने पराभवाचे नेमके कारण काय होते?, याबाबत आपले मत मांडले आहे.
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत शिखर धवनने म्हटले की, “खेळपट्टीत खूप बदल जाणवू लागला होता आणि चेंडूही थांबून येत होता. आम्हाला ठाऊक होते की, आमच्या संघात एक फलंदाज कमी आहे. आम्ही हाच विचार करून मैदानात उतरलो होतो की, या डावात काळजीपूर्वक फलंदाजी करायची आहे. परंतु आम्ही १० ते १५ धावा कमी केल्या. त्यामुळे या सामन्यात मोठे अंतर निर्माण झाले. जर आम्हाला ठरवल्यानुसार धावा करण्यास यश आले असते. तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता.”(Shikhar Dhawan tells reasons of loss against srilanka in 2nd T20I)
तसेच त्याने भारतीय संघाचे कौतुक करत म्हटले की, “मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे. कधीही सामना न सोडण्याची वृत्ती खरच कौतुकास्पद आहे. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी संघातील खेळाडूंना सलाम.” शिखर धवनने या सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक ४० धावांची खेळी केली.
श्रीलंका संघाने ४ गडी राखून मिळवला विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली होती. तर देवदत्त पडिक्कलने २९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी केली. हा सामना श्रीलंका संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधीच धक्के बसलेल्या टीम धवनसाठी वाईट बातमी! ‘हा’ खेळाडू तिसऱ्या टी२०तून होऊ शकतो बाहेर
अव्वल फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, ‘या’ ३ फलंदाजांनी प्रतिस्पर्धींना सदैव चोप दिला