---Advertisement---

आधीच धक्के बसलेल्या टीम धवनसाठी वाईट बातमी! ‘हा’ खेळाडू तिसऱ्या टी२०तून होऊ शकतो बाहेर

---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आज (२९ जुलै) तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कृणाल पंड्या आणि त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर झाले आहेत. यानंतर आता तिसरा व निर्णायक सामना सुरू होण्यापूर्वी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघातील आणखी एक गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर होऊ शकतो.

श्रीलंका दौऱ्यावर पारस म्हाम्ब्रे हे भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी म्हटले की, “दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान खांद्याची दुखापत झालेल्या नवदीप सैनीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मेडिकल टीम लक्ष देऊन आहे.”

या सामन्यात नवदीप सैनीला एकही षटक गोलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या डावातील १९ वे षटक सुरू असताना त्याला संघाबाहेर घेऊन जावे लागले होते. सामना झाल्यानंतर पारस म्हाम्ब्रे यांनी म्हटले की, “नवदीप सैनीवर मेडिकल टीम लक्ष ठेऊन आहे. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करणार आहोत. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. एकदा निर्णय घेतल्यानंतर निवडकर्ते आणि प्रशिक्षकांना याची माहिती दिली जाईल.” (Team india may get another setback nevdeep Saini’s injury increased everyone’s tension)

श्रीलंका संघाने ४ गडी राखून मिळवला विजय 
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली होती. तर देवदत्त पडिक्कलने २९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी केली. हा सामना श्रीलंका संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

आज होणार निर्णायक लढत
दोन्ही संघांमध्ये पहिल्या २ सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार प्रत्युत्तर देत ४ गडी राखून विजय मिळवला आहे. ३ टी-२० सामन्यांची मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे आज (२९ जुलै) होणारा तिसरा टी-२० सामना निर्णायक सामना ठरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझ्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता, शेवटपर्यंत झुंज द्यायची,’ श्रीलंकेच्या सिल्वाची प्रतिक्रिया

धवनने ‘रनमशीन’ कोहलीचा विक्रम केला ध्वस्त, धावा चोपण्याच्या विक्रमात बनला ‘अव्वल’

धावत्या रेल्वेत रंगला हिंदी शिकवणीचा क्लास, भारतीय फलंदाज जेमिमाने विदेशी मैत्रिणींना दिले धडे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---