---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी शिखर धवनचा आहे हा खास प्लॅन…

---Advertisement---

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मागील काही दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. परंतु आता या दुखापतीतून बरे झाल्यानंतर तो आता पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

त्याचबरोबर त्याने त्याच्यासमोर भारतीय संघाला यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विश्वचषक मिळवून द्यायचे उद्दिष्ट ठेवले आहे.

धवनने टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुखापतीतून परतल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटी येथे होणाऱ्या पहिल्या टी20 मध्ये तो पुनरागमन करणार होता. परंतु, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

“मागील वर्षी मला बऱ्याच दुखापतींना सामोरे जावे लागले होते. परंतु हा खेळाचा भाग आहे. हे नवीन वर्ष आहे आणि मी आता नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहे. मला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे,” असे बीसीसीआय.टीव्ही.शी बोलताना धवन म्हणाला.

त्याचबरोबर तो म्हणाला की, “मला या वर्षी संघासाठी आणि स्वत:साठी जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत. माझा प्रयत्न हा प्रभावी खेळाडू बनण्याचा आहे. जेणेकरून मी माझ्या संघासाठी जास्तीत जास्त सामने जिंकून देऊ शकेल. तसेच संघाला विश्वचषकही मिळवून देऊ शकेल.”

धवनने आतापर्यंत 59 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 27.85 च्या सरासरीने 1504 धावा केल्या आहेत. तसेच यामध्ये 9 अर्धशतकांचाही समावेश आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---