---Advertisement---

Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती

Yuzvendra-Chahal-Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारतीय संघाचे अनेक खेळाडू सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बीसीसीआयच्या कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. यादरम्यान हे खेळाडू एकमेकांसोबत वेळ घालवतानाही दिसत आहेत. या कॅम्पमध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल देखील आहे. हे दोघेही त्यांच्या मजेशीर स्वभावासाठी ओळखले जातात. तसेच हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. 

धवन-चहलचा व्हिडिओ व्हायरल
धवनने नुकताच इंस्टाग्रामवर एक रिल पोस्ट केले आहे. त्यामध्ये तो चहलबरोबर जिन्याच्या पायऱ्या चढत आहे. या व्हिडिओमध्ये धवन (Shikhar Dhawan) आणि चहलबरोबर (Yuzvendra Chahal) एनसीएमधील कर्मचारी देखील दिसत आहेत आणि त्यांच्याबरोबर देखील हे दोन्ही खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत.  त्याचबरोबर या व्हिडिओत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील ट्रेनिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या मागे ‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केली आहे.

धवनने या व्हिडिओला (hilarious reel) कॅप्शन दिले आहे की, ‘आमच्या आसपास आमची सेवा करणाऱ्या लोकांनाही आपल्या आयुष्याचा भाग बनवल्यावर त्यांना जो आनंद मिळतो, त्याची मजा काही औरच आहे. मागून भूवीदेखील आनंद घेत आहे.’

सध्या एनसीएमध्ये (NCA) भारताचे मर्यादीत षटकांमधील अनेक खेळाडू कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच दुसरीकडे भारताचा कसोटी संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. एनसीएमधील कॅम्पमध्ये सहभागी झालेले खेळाडू १५ मार्च रोजी आपापल्या आयपीएल फ्रँचायझीशी जोडले जातील. आयपीएल २०२२ हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

https://www.instagram.com/p/CazfGaNqKq3/

धवन-चहल मर्यादीत षटकांसाठी भारताचा भाग
धवन कसोटी आणि टी२० प्रकारातील भारतीय संघात जरी आता नियमित खेळत नसला, तरी तो वनडे संघाचा नियमित सदस्य आहे. तो नुकताच वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता, तर चहल भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा नियमित सदस्य आहे. तो अखेरचा श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळताना दिसला होता. आता हे दोघेही खेळाडू एनसीएमधील कॅम्पनंतर आयपीएल खेळण्यासाठी जातील धवन यंदा पंजाब किंग्सकडून, तर चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ

‘बाप’माणूस गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नासाठी झटलेली स्नेह राणा आता बनलीय टीम इंडियाची ‘संकटमोचक’

कोहलीचं ‘विराट’ मन! १०० व्या कसोटीनंतर विराटची दिव्यांग चाहत्याला जर्सी भेट, व्हिडिओनी जिंकली मने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---