भारताचा संघ सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेत खेळत आहे. भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवन मैदानात दमदार कामगिरी करत आहे. मात्र मैदानाबाहेर त्याला नुकतेच एका समस्येला सामोरे जावे लागले होते.
त्याने ट्विटर आकाउंट हॅक झाले होते. पण आता ते पुन्हा सुरक्षित झाले आहे. त्याचे आकाउंट हॅक झाल्यानंतर त्यावरुन अनेकांना वेगवेगळे संदेश पाठवण्यात आले होते.
पण आता शिखरनेच ट्विट करत आकाउंट सुरक्षित झाल्याचे आणि ज्यांनाही त्यावरुन संदेश आले आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आले आहे.
त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मित्रांनो, कृपा करुन माझ्या अकाउंटवरुन आलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करा. माझे अकाउंट हॅक झाले होते पण आता ते सुरक्षित आहे.’
Hi friends, please ignore any messages you may have received from my handle recently. My account was compromised but it has been restored.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) September 23, 2018
शिखरच्या या ट्विटवर कमेेंट करताना अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशीद खानने मजेशीर कमेंट करत त्यालाही शिखरच्या अकाउंटवरुन संदेश आला होता पण तो यातून वाचला, असे सांगितले आहे. त्याने कमेंट केली आहे की “मलाही संदेश आला होता पण वाचलो मी”
I received it bach Gaya 😂😂
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 23, 2018
धवन आणि राशीद हे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद या एकाच संघाकडून खेळतात. त्यामुळे ते चांगले मित्रही आहे.
राशीदही या एशिया कपमध्ये अफगाणिस्तानकडून खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत 7 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अफगाणिस्तानला सुपर फोर मधील दोन्ही सामन्यात पराभव मिळल्याने त्यांचे एशिया कपमधील आव्हान संपले आहे.
तर भारतीय संघाने आत्तापर्यंत यावर्षीच्या एशिया कपमधील सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या –
–‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा?
–तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट
–टॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी