---Advertisement---

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, शिमरन हेटमायरला दाखवला विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता

Shimron Hetmyer
---Advertisement---

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 अवघ्या दोन आठवड्यांवर (16 ऑक्टोबर) आला आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. खेळाडू देखील विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यासाठी स्वतःच्या फिटनेसची काळजी घेताना दिसत आहेत. काही खेळाडू फिटनेस खराब असल्यामुळे विश्वचषकातून बाहेर झाले. पण वेस्ट इंडीजचा प्रमुख फलंंदाज शिमरन हेटमायर पूर्णपणे फिट असून देखील त्याला विश्वचषकात खेळता येणार नाहीये. वेस्ट इंडीजने त्याचा पर्यायी खेळाडू देखील घोषित केला आहे. 

माहितीनुसार शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) वेस्ट इंडीज संघासोबत (West Indies squad for T20WC) ऑस्ट्रेलिया रवाना होऊ शकला नाही. याच कारणास्तव वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्याला विश्वचषक संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. शमरह ब्रुक्स (Shamarh Brooks) याला शिमरन हेटमायचा बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडीजच्या विश्वचषक संघात सामील केले गेले आहे. बोर्डाकडून घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बोर्डाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, “सीडब्ल्यूआयच्या निवड समितीकडून निर्णय घेतला गेला आहे की, शिमरन हेटमायरने ऑस्ट्रेलियासाठी जाणारे विमान चुकवले आहे. संघाचे नियोजित विमान शनिवार. 1 ऑक्टोबर रोजी रवाना होणार होते, पण त्याने विनंती केल्यानंतर हे नियोजन आधीच बदलले गेले होते.”

क्रिकेट वेस्ट इंडीजचे संचालक जिमी एडम्सने दिलेल्या माहितीनुसार, “आज दुपारी आम्ही सीडब्ल्यूआयला सूचित केले की, निवड समितीमधील सर्वांच्या सहमतीने आम्ही टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) संघात शिमरन हेटमायर ऐवजी शमरह ब्रुक्ससा सामील करत आहोत.” सचालकांनी दिलेल्या माहितीनुसार शिमनरनच्या कौटुंबिक कारणांमुळे शिमरनला आदीच सुट दिली गेली होती. संघाचे नियोजन ऑस्ट्रेलिसाठी शनिवारी रवाना होण्याचे होते, पण त्याने विनंती केल्यानंतर हे सोमवारपर्यंत पुढे ढकलले गेले.

“त्याला हे स्पष्ट सांगितले गेले होते की, जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अजून उशीर झाला, तर आमच्याकडे त्याला संघातून बाहेर करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसेल. आम्ही या महत्वाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघाच्या क्षमतेसोबत जराही तडजोड करू शकत नाही,” असेही संचालकांकडून सांगितले गेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
INDvSA: इंदोरच्या टी20मध्ये विराट-राहुलची रिप्लेसमेंट कोण? ‘या’ खेळाडूंना संधी  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---