---Advertisement---

कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघाची विजयी सलामी

On: शुक्रवार, जानेवारी 10, 2020 2:58 PM
---Advertisement---

नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल आयोजित राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धाला कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने डॉ पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री. महेंद्र (आप्पा) लाड यांनी स्पर्धेच आयोजन केले आहे.

राज्याचे नवनिर्वाचित कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. तसेच आमदार विक्रम सावंत, महेंद्र (आप्पा) लाड, अरुणअण्णा लाड, जे के बापू जाधव, रोहित पाटील, बाळासाहेब चव्हाण, मंगेश चव्हाण यादी मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषाचे २१ संघ तर महिलांचे १६ संघ सहभागी झाले आहेत. महिला गटात शिवशक्ती महिला संघ मुंबई विरुद्ध शेरे महिला संघ कराड यांच्यात उद्घाटनचा सामना झाला. शिवशक्ती संघाने ४८-१७ अशी विजयी सलामी दिली. अपेक्षा टाळके, पोर्णिमा जेधे यांनी चांगला खेळ केला.

जागृती प्रतिष्ठान विरुद्ध डॉ पतंगराव कदम महिला संघ यांच्यात झालेल्या सामन्यांत जागृती प्रतिष्ठान संघाने ४७-२४ अशी बाजी मारली. रखुमाई संघ सोलापूर संघाला जय हनुमान चरी रायगड संघाने २२-१७ असे नमवले. द्रोणा स्पोर्ट्स संघाने ४७-४० असा शिवाजी व्यायाम मंडळाला पराभूत केले.

तर पुरुष गटात बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन पुणे संघाने राजारामबापू स्पोर्ट्स कासेगाव संघाला ३१-१४ असे नमवत विजयी सलामी दिली. अक्षय जाधव, सुनील दुबिले व विकास काळे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तरुण मराठा सांगलीवाडी संघाने मुंबई शहराच्या विजय क्लबला पराभवाचा धक्का दिला. ३३-१८ असा एकतर्फी विजय सांगलीवाडी संघाने मिळवला. उत्कर्ष क्रीडा संस्था पुणे संघाने गुलालवाडी कबड्डी संघ नाशिकला ६१-१३ असे गारद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---