भारतीय महिला संघाला अजून दोन प्रशिक्षक मिळाले आहेत. माजी कसोटी सलामीवीर शिव सुंदर दास यांना फलंदाजी प्रशिक्षक तर, अभय शर्मा यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. पुढील महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. जिथे एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळले जातील. तत्पूर्वी, संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षकपदासाठी एकूण ३६ अर्ज प्राप्त झाले होते. यानंतर ८ उमेदवार अंतिम करून त्यांची मुलाखत घेण्यात आली. रमेश पोवार दुसऱ्यांदा महिला संघाचे प्रशिक्षक बनले आहेत.
इंग्लंड दौर्यासाठी राजकुमारदेवी गायकवाड यांना व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले आहे. सध्या त्या बडोदा महिला निवड समितीच्या प्रमुख आहेत.
दास यांना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव
शिव सुंदर दास यांनी यापूर्वी २०२० मध्ये भारतीय महिला अ संघासह काम केले होते. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार दास यांची केवळ इंग्लंड दौर्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबाबत दास म्हणाले, “प्रथमच मला वरिष्ठ भारतीय महिला संघाबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे. मी संधीबाबत खूप उत्साही आहे. माझ्यासाठी हे एक आव्हान असेल कारण मी एक खेळाडू म्हणून इंग्लंडचा दौरा केला आहे आणि बरेच क्रिकेट खेळले आहे. मी परिस्थितीशी जरासा परिचित आहे. हे संघास मदत करेल. माझे लक्ष फक्त इंग्लंड दौर्याकडे आहे, कारण मी इंग्लंड दौर्यासाठी आलो आहे.”
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय खेळाडूंना १९ मे रोजी मुंबईत पोहचायचे आहे.
अशी राहिली होती कारकीर्द
सध्या ४३ वर्षांच्या असलेल्या शिवसुंदर दास यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजाराहून अधिक धावा केल्या. डाव्या हाताने फलंदाजी करताना त्यांनी १८० सामन्यांत ३९ च्या सरासरीने १०९०८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांचे सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३०० अशी राहिली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास दास यांनी २३ सामन्यात ३५ च्या सरासरीने १३२६ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि ९ अर्धशतके आहेत. त्यांनी ४ वनडे सामनेही खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे खुशखबर
आयपीएलमध्ये भावासमोर गोलंदाजी करताना सॅम करनची ‘अशी’ झाली होती अवस्था, स्वतः केला खुलासा





